शाहरुखची हिरोईन naked party मध्ये गेली, दृश्य पाहून अर्ध्या तासातच काढला पळ; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:37 AM2024-07-16T11:37:46+5:302024-07-16T11:38:36+5:30

अंघोळ करुन गायत्री मंत्र... सुचित्रा कृष्णमूर्तीचं ट्वीट

Suchitra Krishnamoorthi tweets when she went to naked party in berline what happened there | शाहरुखची हिरोईन naked party मध्ये गेली, दृश्य पाहून अर्ध्या तासातच काढला पळ; म्हणाली...

शाहरुखची हिरोईन naked party मध्ये गेली, दृश्य पाहून अर्ध्या तासातच काढला पळ; म्हणाली...

शाहरुख खानसोबत 'कभी हा कभी ना' मध्ये दिसलेली अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीचं (Suchitra Krishnamoorthi) ट्वीट चर्चेत आहे. नुकतीच ती बर्लिनमधील एका naked पार्टीत सहभागी झाली होती. तिथलं दृश्य पाहून तिने तिथून पळच काढला. तिथून आल्यानंतर अंघोळ करुन गायत्री मंत्र म्हणण्याची तिची इच्छा झाली. नेमकं काय घडलं हे तिने ट्वीटमध्ये सांगितलं आहे. 

सुचित्राने ट्वीट करत लिहिले, "नुकतंच मी बर्लिनमध्ये बॉडी पॉझिटिव्हिटी/ नेकेड पार्टीमध्ये सहभागी झाले होते.  आपलं डोकंच खराब होईल इतक्याही पुढारलेल्या विचारांचं होऊ नये, असा विचार त्या ठिकाणी जाऊन माझ्या मनात आला. मी कायमच एक स्वदेशी मुलगी राहीन. आता घरी जाऊन अंघोळ करुन गायत्री मंत्राचा जप करण्याची गरज आहे. बापरे."

बॉलिवूड हंगामाशी बोलताना सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाली, "अशा गोष्टी इथे कॉमन आहेत. बॉडी पॉझिटिव्हिटीला प्रमोट करण्याचा आणि शरिराबाबत चिंता दूर करण्याचा याचा उद्देश आहे. मला वाटलं चला अनुभव घेऊया. माझ्या एका मित्राच्या मित्राने ही पार्टी एका बारमध्ये ठेवली होती. मला पाहुण्यांच्या यादीत ठेवलं गेलं होतं. मी तिथे गेले पण लगेच तिथून पळ काढला. कारण मी एक स्वदेशी मुलगी आहे. मला कोणाचे बॉडी पार्ट्स बघण्यात रस नाही."

ती पुढे म्हणाली, "याचा उद्देश चांगला होता. वल्गर तर अजिबातच नव्हतं. पण भारतीय म्हणून आपण आपल्या शरीराबद्दल सावधगिरी बाळगतो. प्रत्येक गोष्ट सांभाळतो, लपवतो. मी त्या पार्टीत २० ते ३० मिनिटे होती. ही पार्टी पूर्ण रात्रभर चालणार होती. हा पब्लिक इव्हेंट नव्हता केवळ आमंत्रण असेल तरच जायचं होतं."

Web Title: Suchitra Krishnamoorthi tweets when she went to naked party in berline what happened there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.