'किंग'साठी सुहाना खान करतेय कठोर परिश्रम, जिममध्ये गाळतेय घाम, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 14:10 IST2024-10-15T14:06:53+5:302024-10-15T14:10:55+5:30
Suhana Khan : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खानने 'द आर्चीज' चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला

'किंग'साठी सुहाना खान करतेय कठोर परिश्रम, जिममध्ये गाळतेय घाम, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान(Gauri Khan)ची मुलगी सुहाना खान(Suhana Khan)ने 'द आर्चीज' (The Archies Movie) चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला असला तरी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. आता ती तिच्या पुढच्या चित्रपटात रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तेही वडील शाहरुख खानसोबत. या चित्रपटाचे नाव 'किंग' असून सुहाना त्याची जोरदार तयारी करत आहे. तिचा जिममधील वर्कआउटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये सुहाना खान कठोर परिश्रम घेताना दिसत आहे. ती जिममध्ये जड वजन उचलते आणि खूप घाम गाळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की त्यांनी सुहानाला पहिल्यांदाच अशाप्रकारे वर्कआऊट करताना पाहिले आहे.
सुहाना खानने शेअर केला वर्कआउट व्हिडीओ
सुहानाची चुलत बहीण आलिया छिब्बाने या व्हिडिओवर कमेंट केली आहे. चाहतेही भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एकाने लिहिले, 'पुल अप धोकादायक आहे, तुम्ही हे कसे केले.' तिच्या सौंदर्य आणि फिटनेसचे अनेकांनी कौतुक केले आहे.
हा चित्रपट २०२६च्या ईदला होऊ शकतो रिलीज
किंग या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर जानेवारी २०२५ मध्ये हा चित्रपट फ्लोअरवर जाणार आहे. शूटिंग युरोपमध्येही होणार आहे. याचे दिग्दर्शन सुजॉय घोष करणार असून गौरी खान आणि सिद्धार्थ आनंद निर्मित आहेत. शाहरुख आणि सुहाना व्यतिरिक्त अभिषेक बच्चन, अभय वर्मा हे देखील दिसणार आहेत. हा चित्रपट २०२६च्या ईदला रिलीज होऊ शकतो.