हिट आहे ममता-मौजीची कथा, तीनचं दिवसांत ‘सुई धागा’चा बजेट वसूल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 20:35 IST2018-10-01T20:31:20+5:302018-10-01T20:35:06+5:30
वरूण धवन आणि अनुष्का शर्माच्या ‘सुई धागा’ची कथा बॉक्सआॅफिसवर यशस्वी ठरली आहे. होय, ममता व मौजीच्या या कथेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून गत ३ दिवसांत चित्रपटाने ३६ कोटी रूपयांची कमाई केली आहे.

हिट आहे ममता-मौजीची कथा, तीनचं दिवसांत ‘सुई धागा’चा बजेट वसूल!
वरूण धवन आणि अनुष्का शर्माच्या ‘सुई धागा’ची कथा बॉक्सआॅफिसवर यशस्वी ठरली आहे. होय, ममता व मौजीच्या या कथेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून गत ३ दिवसांत चित्रपटाने ३६ कोटी रूपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, या कमाईसोबतचं ‘सुई धागा’ यंदाच्या हिट चित्रपटांच्या यादीत विराजमान झाला आहे, ट्रेड एक्सर्प्ट तरण आदर्श यांनी ‘सुई धागा’च्या कमाईची आकडेवारी दिली आहे. तरण यांचे मानाल तर, ‘सुई धागा’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. याचमुळे प्रेक्षकांचा याला चांगला प्रतिसाद मिळतोय. रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजे गत शुक्रवारी या चित्रपटाने ८.३० कोटी रूपये कमावले. शनिवारी १२.२५ कोटी आणि रविवारी १६.०५ कोटींचा गल्ला जमवला. अशाप्रकारे गत तीन दिवसांत चित्रपटाने ३६.६० कोटी रूपये कमावले़
चित्रपटाच्या बजेटबद्दल सांगायचे तर या चित्रपटावर २५ कोटी रूपये खर्च केले गेलेत. तीन दिवसांच्या कमाईतचं ‘सुई धागा’ने हा खर्च वसूल केला आहे. म्हणजेचं चित्रपट हिट आहे.
‘सुई धागा’पूर्र्वी बॉक्सआॅफिसवर रिलीज झालेल्या राजकुमार राव व श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री’ या चित्रपटानेही दमदार कमाई केली होती. तरण आदर्श यांनी ‘सुई धागा’ आणि ‘स्त्री’ यांच्यातील तीन योगायोग सांगितले आहेत. होय, ‘सुई धागा’ आणि ‘स्त्री’ हे दोन्ही चित्रपट मध्यप्रदेशच्या चंदेरी येथे चित्ररत झालेत. ‘सुई धागा’मध्ये वरूण धवनने तर ‘स्त्री’मध्ये राज कुमारने टेलर अर्थात शिंप्याचीच भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘सुई धागा’ आणि ‘स्त्री’चे शीर्षक ‘स’ पासून सुरू होतेय आणि दोन्ही चित्रपट हिट आहेत.
‘सुई धागा’सोबत रिलीज झालेल्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’चे ओपनिंग तुलनेने थंड आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत केवळ ४.०५ कोटी रूपये कमावले आहेत. याचे एक कारण कमी स्क्रिन्स हेही मानले जात आहे. हा चित्रपट केवळ ८७५ स्क्रिन्सवरचं रिलीज केला गेला आहे.