‘लोकमत’च्या व्यासपीठावर ‘ममता- मौजी’ची हजेरी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 08:47 PM2018-09-12T20:47:49+5:302018-09-12T20:51:07+5:30
आज महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. स्व:कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व समाजात परिवर्तन घडवून आणणा-या विविध क्षेत्रातील महिला उद्योजिकांचा सन्मान लोकमततर्फे करण्यात आला. जुहू या सोहळ्याच्या व्यासपीठावर ‘ममता-मौजी’ अर्थात अनुष्का शर्मा व वरूण धवन यांनी हजेरी लावली आणि सोहळ्याला जणू ‘चार चाँद’ लागले.
आज महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. स्व:कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व समाजात परिवर्तन घडवून आणणा-या विविध क्षेत्रातील महिला उद्योजिकांचा सन्मान लोकमततर्फे करण्यात आला. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील या सोहळ्याच्या व्यासपीठावर ‘ममता-मौजी’ अर्थात अनुष्का शर्मा व वरूण धवन यांनी हजेरी लावली आणि सोहळ्याला जणू ‘चार चाँद’ लागले.
अनुष्का व वरूणचा ‘सुईधागा’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात अनुष्काने ममताची तर वरूणने मौजीची भूमिका साकारली आहे. ममता व मौजी अनेक खस्ता खात स्वत:चा उद्योग उभा करतात. नेमका हाच धागा ‘ममता-मौजी’च्या जोडीला आजच्या या सोहळ्यात घेऊन आला. यावेळी अनुष्का व वरूणच्या ‘सुईधागा’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला.
लोकमतच्या व्यासपीठावर अशा धडाधडीच्या महिला उद्योजिकांना भेट, यापेक्षा मोठी संधी नाही, त्याहून मोठा आनंद नाही, असे वरूण यावेळी म्हणाला.
‘सुईधागा’या चित्रपटात एका दांम्पत्याची कथा सांगण्यात आली आहे. जे अनेक खस्ता खात स्वत:चा व्यवसाय सुरु करतात. चित्रपटात वरुण धवन आणि अनुष्का शर्मा पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा ममता(अनुष्का) आणि मौजी(वरुण धवन) यांची आहे. मौजी हा लहान-मोठी नौकरी करत असतो, त्याला मालकाकडून अनेक वेळा अपमानाचा सामना करावा लागतो. तर ममता गृहिणी आहे. नव-याच्या सततच्या अपमानामुळे व्यस्थित ममता त्याला नोकरी सोडून स्वत:चे काम करण्याचा सल्ला देते. मौजी नोकरी सोडतो आणि शिलाईचा व्यवसाय उघडतो. यामध्ये ममता त्याची मदत करते.