बापरे..! '३ इडियट्स'मधील सुसाइड सीन करणं अली फजलला पडलं होतं महागात, पडला होता डिप्रेशनला बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 15:05 IST2021-06-24T15:05:05+5:302021-06-24T15:05:48+5:30
बॉलिवूड अभिनेता अली फजल '३ इडियट्स' चित्रपटात जॉय लोबो नामक विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती.

बापरे..! '३ इडियट्स'मधील सुसाइड सीन करणं अली फजलला पडलं होतं महागात, पडला होता डिप्रेशनला बळी
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांच्या '३ इडियट्स' चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले होते. २००९ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला होता. मात्र या चित्रपटात काम केल्यानंतर अभिनेता अली फजलच्या आयुष्यात काही वेगळाच बदल झाला होता.
'३ इडियट्स' सिनेमात अली फजलने काम केले असल्याचे तुम्हाला आठवत नसेल. पण या चित्रपटात अली फजलने जॉय लोबो नामक एका विद्यार्थ्यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असलेला जॉय लोबो खिडकीतून उडी मारून आत्महत्या करतो. जॉयची भूमिका निभावल्यानंतर अली डिप्रेशनमध्ये गेला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अलीने या चित्रपटात काम केल्यानंतर त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला होता, याचा खुलासा केला आहे.
पीपिंग मूनच्या रिपोर्टनुसार, अली फजलने सांगितले की, जेव्हा मी '३ इडियट्स' चित्रपटात काम केले तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. खरेतर मी चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र या भूमिकेनंतर काय माझ्यासोबत काय घडले असेल याबद्दल कुणालाच माहित नसेल. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या बातम्या माझ्या समोर आल्या. त्यानंतर मला एका वृत्त वाहिनीतून फोन आला. हा फोन माझ्या प्रतिक्रियेसाठी होता. ‘सर तुम्ही जी भूमिका साकारली होती अगदी तसेच घडले आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे?’ असे मला विचारण्यात आल्यानंतर मी खूपच अस्वस्थ झालो होतो.
पुढे अली फजलने सांगितले की, त्यावेळी मी कॉलेजमध्येहोतो. मी खूप निरागस होतो. मी नैराश्यात गेलो होतो. मी आमचे दिग्दर्शक राजू सर आणि काही लोकांशी बोललो. या सर्वांनी मला समजावले. मी कोणताही उलट सुलट निर्णय घेऊ नये आणि असा विचार करू नये असे त्यांनी समजावले.