'सनी देओल अन् डिंपल कपाडिया प्रेमात होते? दोघांच्या अफेअरबद्दल सुजाता मेहतांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 15:34 IST2024-09-14T15:32:32+5:302024-09-14T15:34:28+5:30
सुजाता मेहता यांनी दोघांसोबत काम केलं होतं. सेटवरचा किस्सा त्यांनी शेअर केला.

'सनी देओल अन् डिंपल कपाडिया प्रेमात होते? दोघांच्या अफेअरबद्दल सुजाता मेहतांचा खुलासा
सनी देओल(Sunny Deol) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) दोघंही हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार. एकेकाळी दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यांचं अफेअर चर्चेत होतं. मात्र आजपर्यंत त्यांनी यावर कधीच स्पष्टीकरण दिलं नाही. आता त्यांच्याच काळातील एका अभिनेत्रीने दोघांची पोलखोल केली आहे. दोघंही कसे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते याचा किस्सा अभिनेत्रीने सांगितला आहे.
ही अभिनेत्री आहे सुजाता मेहता. त्यांनी 'प्रतिघात', 'चित्कार', 'जंग', 'साधन' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्यातील केमिस्ट्रीचा खुलासा केला. त्या म्हणाल्या, "मी गुनाह सिनेमात त्यांच्यासोबत काम केलं. त्यांच्यात खूपच गोड केमिस्ट्री होती. ते एकमेकांच्या खूप जवळ होते. त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांपासून ते लपून राहिलेलं नाही. आमच्या क्षेत्रात सगळं प्रोफेशनल असतं. आपापलं काम करुन सगळे निघून जातात. गुनाहच्या सेटवर जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा सनी आणि डिंपल यांच्यातलं नातं लगेच कळून यायचं. ऑन कॅमेरा आणि ऑफ कॅमेराही ते तसेच असायचे. जसे काही ते एकमेकांसाठीच बनले आहेत."
त्या पुढे म्हणाल्या, "मी राजेश खन्ना यांच्या जय जय शिव शंकरमध्ये काम करणार होते. पण नंतर डिंपलने मला रिप्लेस केलं. कारण त्यांच्या मुलांना आपल्या आईवडिलांनी एकत्र काम करावं अशी इच्छा होती. मात्र हा सिनेमा रिलीजच होऊ शकला नाही."
८० च्या दशकात सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरची चर्चा जोरदार होती. त्यांनी 'आग ता गोला','मंजिल मंजिल','नरसिम्हा' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.