जॅकलीनच्या फोटोवर कमेंट करणं महागात पडलं! मिका सिंहला सुकेश चंद्रशेखरने जेलमधून पाठवली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 13:26 IST2023-10-05T13:25:24+5:302023-10-05T13:26:29+5:30
२०० कोटी मनी लॉड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता सुकेशने जेलमधून मिका सिंहला नोटीस पाठवली आहे.

जॅकलीनच्या फोटोवर कमेंट करणं महागात पडलं! मिका सिंहला सुकेश चंद्रशेखरने जेलमधून पाठवली नोटीस
२०० कोटी मनी लॉड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नावही समोर आलं होतं. सुकेश आणि जॅकलिन फर्नांडिसचे प्रेमसंबंध असल्याचं तपासात उघड झालं होतं. कित्येकदा सुकेशने तुरुंगातून जॅकलिनवरील प्रेमही व्यक्त केलं होतं. त्याने जॅकलिनला प्रेमपत्रही लिहिलं होतं. आता सुकेशने जेलमधून मिका सिंहला नोटीस पाठवली आहे.
जॅकलिनने काही दिवसांपूर्वी हॉलिवूड अभिनेता जीन क्लाउडबरोबरील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले होते. या फोटोवर गायक मिका सिंहने कमेंट केली होती. "तू खूप सुंदर दिसत आहेस...त्या सुकेशपेक्षा कित्येक पटीने चांगली", अशी कमेंट केली होती. काही वेळाने मिका सिंहने ही कमेंट डिलीटही केली होती. पण, जॅकलिनच्या फोटोवर कमेंट करणं मिका सिंहला महागात पडलं आहे.
मिका सिंहला सुकेश चंद्रशेखरने जेलमधून नोटीस पाठवली आहे. सुकेशच्या वकिलाकडून मिका सिंहला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. "तुम्ही अशी कमेंट करुन माझ्या क्लाइंलच्या चारित्र्य आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तुमच्या या टिप्पणीमुळे त्यांनी मीडियाच्या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे," असं मिका सिंहला पाठवलेल्या नोटिशीत म्हटलं गेलं आहे.
सुकेशने दिलेल्या या नोटिशीत मिका सिंहला माफी मागण्यास सांगण्यात आलं आहे. "आमच्या क्लाइंटला बदनाम करणे आणि त्यांची प्रतिष्ठा धुळीत मिळवण्याचा आपल्याकडून जाणीवपूर्वक केला गेलेला प्रयत्न निराशाजनक आहे. या अपमानास्पद टिप्पणीसाठी तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते," असंही या नोटिशीत म्हटलं आहे.