करिना कपूरच्या अभिनेत्याच्या घरी कुणी तरी येणार गं, सोशल मीडियावर दिली गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 17:17 IST2020-04-06T17:04:11+5:302020-04-06T17:17:59+5:30
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सनासोबत ही गुडन्यूज त्यांनी शेअर केली आहे.

करिना कपूरच्या अभिनेत्याच्या घरी कुणी तरी येणार गं, सोशल मीडियावर दिली गुडन्यूज
'वीरे दी वेडिंग', आरक्षण, पार्च्ड सारख्या सिनेमात आपलं अभिनय कौशल्य दाखवलेल्या अभिनेता सुमीत व्यासच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. ही आनंदाची बातमी सुमीत आणि त्याची पत्नी एकता कौल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना दिली. पुढच्या महिन्यात एकता बाळाला जन्म देणार आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी दोघे उत्साहित आहेत.
एकता आपला आनंद व्यक्त करताना म्हणाली, आम्ही आमच्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी खूप आनंदी आहोत. कोरोना व्हायरसमुळे काही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी आम्ही घरातून बाहेर निघणं बंद केले आहे तसेच लोकांना भेटणेसुद्धा बंद केले आहे. जर कोरोना व्हायरसाचा प्रार्दुभाव झाला नसता तरी ही वेळ आमच्यासाठी सहज निघून गेली असती. सुमीत माझी खूप काळजी घेतो आहे. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की तो माझ्यासोबत आहे. एरव्ही तो त्याच्या कामात व्यस्त असतो.
एकतादेखील टीव्ही अभिनेत्री आहे. एकताने 'रब से सोना इश्क 'बडे अच्छे लगते हैं' 'ये है आशिकी' 'एक रिश्ता ऐसा भी' 'मेरे अंगने में' या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सुमीत आणि एकतामधील खूप चांगली केमिस्ट्री सोशल मीडियावर पाहायला मिळते. एकता सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. आपल्या पतीसह आकर्षक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.