दीपिका पादुकोण साकारणार सुनंदा पुष्करची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 07:09 PM2018-11-01T19:09:31+5:302018-11-01T19:10:37+5:30

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

Sunanda Pushkar's role to play Deepika Padukone? | दीपिका पादुकोण साकारणार सुनंदा पुष्करची भूमिका?

दीपिका पादुकोण साकारणार सुनंदा पुष्करची भूमिका?

googlenewsNext
ठळक मुद्देसुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेसाठी दीपिका पादुकोणच्या नावाची चर्चा

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपटाचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. या सिनेमातील सुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. 

शशी थरूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर काही वर्षांतच सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली. त्यांचा मृतदेह दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सापडला होता. सध्या या खुनाचा खटला दिल्ली न्यायालयात सुरू आहे. या चित्रपटात शशी थरूर यांची भूमिका कोण साकारणार हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
दीपिकाच्या आयुष्यातील वैवाहिक टप्प्याला पुढच्या महिन्यात सुरुवात होणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४ व १५ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या ६ वर्षांपासून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात गुरफटलेले आहेत. 'रामलीला' या सिनेमापासून त्यांची जवळीक वाढली आणि ते आता नेहमीसाठी एक होणार आहेत. या जोडीच्या रिलेशनशिपची खासियत म्हणजे सहा वर्ष एकत्र असूनही त्यांचं एकमेकांप्रती आकर्षण, प्रेम आणि विश्वास तसाच कायम आहे. आत्तापर्यंतची चर्चा खरी मानाल तर इटलीच्या लेक कोमोमध्ये हे लग्न होणार आहे. अर्थात दोघांनीही याबाबतची घोषणा केलेली नाही. दोघांचेही लग्न पारंपरिक रितीरिवाजानुसार होणार आहे. १३ नोव्हेंबरला संगीत सेरेमनी आणि १५ नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमोमध्ये शाही लग्न रंगणार आहे. विवाह समारंभासाठी दीपिकाच्या वेशभूषेची रचना प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्यसाची करत आहेत. प्रियांका आणि निक यांचाही विवाह याच दरम्यान होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Sunanda Pushkar's role to play Deepika Padukone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.