लेक असावा तर असा! वडिलांनी जिथे टेबल पुसले तीच रेस्टॉरंटची इमारत सुनील शेट्टीने केली खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 02:02 PM2024-06-19T14:02:34+5:302024-06-19T14:10:12+5:30

Suniel shetty:वडिलांच्या कष्टाचं चीज करत सुनीलने चक्क त्या हॉटेलच्या आसपासच्या सगळ्या इमारती खरेदी केल्या.

suniel-shetty-recall-his-fathers-struggling-days-now-actor-is-owner-of-three-buildings-where-his-father-worked | लेक असावा तर असा! वडिलांनी जिथे टेबल पुसले तीच रेस्टॉरंटची इमारत सुनील शेट्टीने केली खरेदी

लेक असावा तर असा! वडिलांनी जिथे टेबल पुसले तीच रेस्टॉरंटची इमारत सुनील शेट्टीने केली खरेदी

बॉलिवूडमधील मोस्ट टॅलेंडेट अभिनेत्यांच्या यादीत सुनील शेट्टीचा आवर्जुन उल्लेख केला जातो. आजवर त्याने अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. इतकंच नाही तर कलाविश्वासह तो एक यशस्वी उद्योजकदेखील आहे. सुनीलचं त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम असून तो बऱ्याचदा त्याच्या वडिलांविषयी व्यक्त होत असतो. सुनीलचे वडील एकेकाळी हॉटेलमध्ये टेबल पुसायचं काम करायचे. मात्र, वडिलांच्या कष्टाचं चीज करत सुनीलने चक्क त्या हॉटेलच्या आसपासच्या सगळ्या इमारती खरेदी केल्या.

अलिकडेच सुनील शेट्टीने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या वडिलांच्या स्ट्रगलवर भाष्य केलं. त्याचे वडील वयाच्या ९ व्या वर्षी कामाच्या शोधात मँगलोरवरुन मुंबईला आले होते. इथे एका हॉटेलमध्ये त्यांनी बरीच वर्ष काम केलं. त्यानंतर त्यांनी ज्या हॉटेलमध्ये काम केलं त्या हॉटेलच्या तीनही इमारती सुनीलने खरेदी केल्या.

"माझे वडील कामाचा शोधात लहानपणीच मुंबईला पळून आले होते. वडील (सुनील शेट्टीचे आजोबा) नसल्यामुळे वयाच्या नवव्या वर्षीच त्यांच्यावर (वडिलांवर) तीन बहिणींची जबाबदारी आली. त्यामुळे ते मुंबईला आले. इथे आल्यावर त्यांनी एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली. हे हॉटेल आमच्याच कम्युनिटीचं होतं त्यामुळे आम्ही एकमेकांना कायम सपोर्ट करतो. त्याचं पहिलं काम टेबल पुसण्याचं होतं", असं सुनील म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "एक एक टप्पा पार करत माझ्या वडिलांनी स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं. आज ते जिथे काम करायचे त्याच हॉटेलच्या तीनही इमारती त्यांच्या नावावर आहेत. माझे वडील जेथे काम करायचे त्या हॉटेलचा मालकाने त्यांना मॅनेजर केलं होतं. मात्र, जेव्हा त्यांचा बॉस रिटायर्ड झाला त्यावेळी माझ्या वडिलांनी त्याच हॉटेलच्या तीनही इमारती खरेदी केल्या. आज, माझ्याही मालकीच्या तीन इमारती आहेत."

दरम्यान, सुनील शेट्टीच्या वडिलांचं २०१७ मध्ये निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. लवकरच 'वेलकम टू द जंगल' या सिनेमात झळकणार आहे. सध्या तो डान्स दिवाने ४ मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळकत आहे.

Web Title: suniel-shetty-recall-his-fathers-struggling-days-now-actor-is-owner-of-three-buildings-where-his-father-worked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.