कठीण काळात मदतीला पुढे सरसावला सुनिल शेट्टी, पुरवतोय मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:27 PM2021-04-28T17:27:31+5:302021-04-28T17:32:22+5:30
Suniel Shetty starts an initiative provide free oxygen concentrators : गरजूंना मदत करण्याचे आवाहनही सुनील शेट्टीने केले आहे.
कोरोना व्हायरसची दुसरी लाट पाहून बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीही मदतीसाठी पुढे आले आहे. तो मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटरच्या उपक्रमात सामील झाला आहे. गरजूंना मदत करण्याचे आवाहनही सुनील शेट्टीने केले आहे.
सुनील शेट्टी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आम्ही काही टेस्टिंग टाइम्समधून जात आहोत, पण एकमेकांना मदत करण्यासाठी आपले लोक ज्या पद्धतीने हात पुढे करत आहेत तो एक आशेचा किरण आहे.” त्याने आपल्या ट्विटद्वारे म्हटले आहे की, केव्हीएन फाउंडेशनशी जोडला गेला असून लोकांना मोफत ऑक्सिजन पुरवत आहे.
We are going through some testing times, but a ray of hope in this is the way our people have joined hands to help each other. I am grateful to be a part of this initiative along with @FeedMyCity1, an initiative of #KVNFoundation, to provide free oxygen concentrators. pic.twitter.com/uhOrvn6tZA
— Suniel Shetty (@SunielVShetty) April 28, 2021
सुनील शेट्टीला थेट मेसेज करु शकता
सुनील शेट्टीने आपल्या ट्विटमध्ये पुढे असे लिहिले आहे की, "मी माझ्या सर्व मित्रांना आणि चाहत्यांना आवाहन करतो. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही मला मेसेज करु शकता, ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांना तुम्ही ओळखता किंवा तुम्हालाही या मिशनचा भाग व्हायचं आहे. हा मेसेज शक्यो तेवढा व्हायरल करा.
सुनील शेट्टीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ते आणि केव्हीएन फाउंडेशन सध्या फक्त मुंबई आणि बंगळुरूमध्ये कार्यरत आहेत. यासह त्याने लोकांना आपले योगदान देण्याचे आवाहनही केले आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने देशातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता सुमारे 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर दिले आहेत. यासाठी त्यांनी अधिकृत आणि विश्वासार्ह एनजीओची माहिती मागितली होती.