मुहूर्त ठरला, या सुपरस्टारचा मुलगा करणार लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 17:07 IST2019-08-06T17:03:30+5:302019-08-06T17:07:31+5:30
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्टार किड्सचे डेब्यूची चर्चा आहे. सारा अली खान, अनन्या पांडे, जान्हवी आणि प्रनूतन या स्टारकिड्सनी बी-टाऊनमध्ये पदार्पण केले आहे.

मुहूर्त ठरला, या सुपरस्टारचा मुलगा करणार लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री !
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्टार किड्सचे डेब्यूची चर्चा आहे. सारा अली खान, अनन्या पांडे, जान्हवी आणि प्रनूतन या स्टारकिड्सनी बी-टाऊनमध्ये पदार्पण केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीच्या डेब्यूची देखील चर्चा होती. अहान 2018मध्ये आलेल्या 'आरएक्स 100' या तमिळ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे.
निमार्ता साजिद नाडियादवाला अहानला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. दिग्दर्शन मिलन लुथरिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. मिलन लुथरियाने आत्तापर्यंत वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई , द डर्टी पिक्चर , बादशाहो यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
अहान गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन देखील चर्चेत आहे. अहान आणि तनिया अनेकदा एकमेकांसोबत दिसले. यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. पण दोघांनीही या नात्याबद्दल बोलणे टाळले. पण आता अहानने स्वत:चं या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
अहानच्या आधी त्याची बहीण अथिया शेट्टी हिने २०१५ मध्ये बॉलिवूड डेब्यू केला होता. सलमान खान निर्मित ‘हिरो’मधून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या चित्रपटात अथिया सूरज पांचोलीसोबत दिसली होती. पण हा चित्रपट दणकून आपटला होता. अथिया व सूरजची जोडी प्रेक्षकांना आवडली नव्हती. अथियानंतर अहान आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. आता त्याचा डेब्यू किती यशस्वी होतो, ते बघूच.