सुनील ग्रोव्हरचे पंतप्रधान मोदींना पत्र; दाऊदला पकडण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 06:39 PM2016-12-23T18:39:31+5:302016-12-23T19:14:31+5:30

sunil grover writes an open letter to pm modi to get dawood nabbed; सुनील ग्रोव्हरने पंतप्रधानांना लिहलेल्या खुल्या पत्रात तो म्हणतो, दाऊदला पकडण्यासाठी वेळ लागणार आहे हे आम्हाला माहित आहे. मात्र दाऊदला पकडून त्याला सर्वसामान्यांनी प्रश्न विचारायला हवेत.

Sunil Grover's letter to PM Modi; Appeal to catch Dawood | सुनील ग्रोव्हरचे पंतप्रधान मोदींना पत्र; दाऊदला पकडण्याचे आवाहन

सुनील ग्रोव्हरचे पंतप्रधान मोदींना पत्र; दाऊदला पकडण्याचे आवाहन

googlenewsNext
ong>अभिनेता सुनील ग्रोव्हर याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडून भारतात आणावे असे आवाहन केले आहे. १९९३च्या मुंबई बॉम्ब स्फोटात दाऊदचा हात असल्याचे उघड झाले असल्याने त्याला पकडून त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात कारवाई करावी असे त्याने आपल्या पत्रात नमूद केले आहे. 




अभिनेता सुनील ग्रोव्हरचा आगामी चित्रपट ‘काफी विद डी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या सारख्या लूक मध्ये दिसणार आहे. त्याच्या पात्राचे नावही अर्णब असेच असून, तो आपल्या बंद होणाºया चॅनलसाठी ‘दाऊद’ची मुलाखत घेण्याचा निर्णय घेतो. यासाठी त्याची धडपड या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, तो यात दाऊदची मुलाखत घेताना दिसतो आहे. अभिनेता जाकिर हुसैन यांनी दाऊदची भूमिका साकारली आहे. विशाल मिश्रा दिग्दर्शित ‘कॉफी विद डी’ हा कॉमेडी चित्रपट आहे. 




‘कॉफी विद डी’च्या प्रमोशनसाठी सुनील ग्रोव्हरने पंतप्रधानांना लिहिलेल्या खुल्या पत्रात तो म्हणतो, दाऊदला पकडण्यासाठी वेळ लागणार आहे हे आम्हाला माहित आहे, मात्र दाऊदला पकडून त्याला सर्वसामान्यांनी प्रश्न विचारायला हवेत. यामुळे लोक त्याला आपला गुन्हा कबुल करताना पाहतील. पत्रात सुनीलने सरकारच्या अनेक गोष्टींची प्रशंसा केली आहे. स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया आणि नोटाबंदी याचाही उल्लेख त्याने केला आहे. सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक त्याने केले. 

सुनील ग्रोव्हर याने अनेका मालिका व चित्रपटांत काम केले असले तरी ‘कपिल शर्मा शो’मध्ये डॉ. मशहूर गुलाटी या भूमिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सुनीलची मुख्य भूमिका असणारा ‘कॉफी विद डी’ हा कॉमेडी चित्रपट ६ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. ​


Web Title: Sunil Grover's letter to PM Modi; Appeal to catch Dawood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.