सुनील शेट्टीने ‘83’ पाहिल्यावर दिली शॉकिंग प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाला, कसा आहे सिनेमा?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 06:27 PM2021-12-21T18:27:40+5:302021-12-21T18:28:24+5:30
Sunil Shetty Response On 83: रणवीर सिंगनं ‘83’ या सिनेमासाठी अफाट मेहनत घेतली... 6 महिने दररोज 4 तास खेळत होता क्रिकेट... पण त्याची ही मेहनत किती सफल झाली?
Sunil Shetty Response On 83: 25 जून 1983 ही तारीख भारतातील तमाम क्रिकेटप्रेमींच्या काळजावर कायमची कोरली गेलीये. होय, याच दिवशी भारतीय क्रिकेट संघानं पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देशाच्या क्रिकेट अध्यायातील सोनेरी पान लिहिलं होतं. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली संघानं विश्वचषक उंचावला तेव्हा अख्खा देशाचा ऊर अभिमानानं भरून आला होता. याच भीमपराक्रमाची कहाणी ‘83’ या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीयांना पाहायला मिळणार आहे. येत्या शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. त्याआधी या चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला आणि तो पाहून बॉलिवूडचे अनेक कलाकारांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सुनील शेट्टी (Sunil Shetty ) याने तर हा सिनेमा पाहून अशी काही प्रतिक्रिया दिली की, सर्वत्र त्याच्या या प्रतिक्रियेचीच चर्चा रंगली.
Went to watch @RanveerOfficial in #83. Couldn’t spot him. There was only #KapilDev on screen. Incredible transformation. I am stunned beyond. A team cast that could’ve walked off Lords. Got gooseflesh like I was reliving ‘83. Still shaken & teary-eyed at the artistry & emotions. pic.twitter.com/IW8zGYNsyc
— Suniel Shetty (@SunielVShetty) December 20, 2021
ट्विटरवर सुनील शेट्टीने ‘83’बद्दल पोस्ट केली आहे. ‘मी रणवीर सिंगचा (Ranveer Singh) 83 चित्रपट पाहायला गेलो होतो. पण चित्रपटात रणवीर मला कुठेही दिसला नाही. पडद्यावर मला दिसला तो कपिल देव होता. फारच उत्कृष्ट ट्रान्सफॉर्मेशन. एका क्षणासाठी मी सुद्धा चकीत झालो कारण पडद्यावर मला अगदी हुबेहूब कपिल देव असल्याचा भास झाला. 83 चित्रपट पाहून अंगावर शहारा आला. या चित्रपटातील अभिनय आणि भावनांची जादू पाहून मला अजून धडधडतंय आणि माझे डोळे पाणावले आहेत,’असं ट्विट सुनील शेट्टीनं केलं आहे.
‘हा विश्वास आहे आणि पडद्यावर त्याचंच दर्शन घडलंय. कबीर खानचा चांगुलपणा, त्याच्या कथेवरील विश्वास, चित्रपटातील दृश्ये आणि पात्रांच्या ताकदीमुळे माझे मन जिंकलं,’असंही सुनील शेट्टीनं पुढं लिहिलंय.
सुनील शेट्टीच्या या प्रतिक्रियेतून या चित्रपटासाठी रणवीरने घेतलेली मेहनत दिसते. कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारणं रणवीरसाठी सोप्प नव्हतं. त्यांची खेळण्याची अॅक्शनच नाही तर चालण्याची पद्धत आणि ग्रेडियंट देखील त्यानं हुबेहूब कॉपी केली आहे. रणवीरसाठी कपिल देवची बॉलिंग अॅक्शन कॉपी करणं सर्वात कठीण होतं. कारण रणवीरचं शरीर कपिल यांच्यापेक्षा खूप वेगळं आहे. त्यामुळे रणवीर शारीरिक परिवर्तन करावं लागलं. सुरुवातीला रणवीरचं शरीर खूप जड होतं, कारण तो ‘सिम्बा’च्या शूटमधून आला होता. मग काय 6 महिने तो रोज 4 तास क्रिकेट खेळायचा आणि 6 महिने 2 तास स्वत:चह फिजिकल कंडिशनिंग करायचा.
‘83’ हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कबीर खान यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.