"..तर तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही!" सुनील शेट्टींनी केलं KL राहुलचं कौतुक, म्हणाले- "त्याचा संघर्ष मी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:43 IST2025-04-14T12:43:23+5:302025-04-14T12:43:48+5:30
सध्या IPL चा नवीन सीझन गाजवत असलेल्या के. एल. राहुलचं त्याचे सासरे सुनील शेट्टींनी चांगलं कौतुक करुन त्याचा स्ट्रगल सर्वांना सांगितला आहे (sunil shetty, kl rahul)

"..तर तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही!" सुनील शेट्टींनी केलं KL राहुलचं कौतुक, म्हणाले- "त्याचा संघर्ष मी..."
सध्या IPL चा सीझन चांगलाच गाजत आहे. या सीझनमध्ये पुन्हा एकदा भारतीय फलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. काहीच दिवसांपूर्वी RCB vs DC ही मॅच झाली. या मॅचमध्ये दिल्लीच्या के. एल. राहुलने (kl rahul) उत्कृष्ट फलंदाजी करत दिल्लीच्या संघाला सामना जिंकून दिला. के. एल. राहुलच्या फलंदाजीचं खूप कौतुक झालं. अशातच राहुलचे सासरे आणि सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टींनी (sunil shetty) एका मुलाखतीत जावयाचं कौतुक केलं.
सुनील शेट्टींनी रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये याविषयी सांगितलं की, "माझा त्याला इतकाच सल्ला असतो, कोणा दुसऱ्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी करु नको. मला त्याच्याबद्दल सर्व माहित आहे. तो क्रिकेटर म्हणून तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. जेव्हा तुम्ही टेक्निकली चांगले फलंदाज असता किंवा तुम्ही जे करता त्यात टेक्निकली परफेक्ट असता, तेव्हा लोक येतात आणि जातात. पण ते तुमची जागा कधीच घेऊ शकणार नाहीत. कारण तुम्ही स्वतः ते मिळवलंय."
"मंगळुरुमधील एका छोट्या शहरातून राहुल येतो. मी सुद्धा त्याच शहरातला आहे. मी जिथे जन्माला आलो तिथून त्याचं घर तीन किलोमीटर दूर आहे. तिथे खेळाचं मैदान नाहीये. अशा वातावरणात कोणतंही साधन नसताना देशासाठी खेळायला मिळणं, यामागे फार मोठा संघर्ष आहे. यालाच टॅलेंट म्हणतात." अशाप्रकारे सुनील शेट्टींनी के.एल. राहुलचं चांगलंच कौतुक केलं. सुनील शेट्टींची लेक अथियासोबत के.एल.राहुलने लग्न केलं. अथिया आणि के. एल. राहुल आई-बाबा झाले असून त्यांना मुलगी झाली.