सुनील शेट्टी म्हणतोय, 'बॉलिवूडमध्ये यश आणि अपयश खूप महत्त्वाचे'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:51 PM2021-03-24T17:51:12+5:302021-03-24T17:51:48+5:30
सुनील शेट्टी रेडिओवरील एका शोचे सूत्रसंचालन करतो आहे.
बॉलिवूड तीन दशकांपर्यंत अभिनेता सुनील शेट्टीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये १९९२ साली बलवान चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने सपूत, मोहरा, हूतूतू, क्रोध, हेराफेरी, दस, कांटे, बॉर्डर, गोपी-किशन आणि चुप-चुपके यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. यशाच्या आधारावर कोणत्याही कलाकाराचे परिक्षण करणे हे मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक असल्याचे सुनील शेट्टीने सांगितले.
न्यूज एजेंसी आईएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीला बॉलिवूडमधील वेगवान गती जीवनाला थकवणारी वाटते का? त्यावर सुनील शेट्टी म्हणाला की, वेग आणि प्रयत्न कधीच थकवत नाही. थकवतात तर ते लोक, जे आसपास असतात आणि सातत्याने ते तुमचे परीक्षण करत असतात. इथे यश आणि अपयश खूप महत्त्वाचे आहे. कारण तुमच्या यशाच्या जोरावरच तुमचे परीक्षण केले जाते आणि हे मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक आहे.
त्याने पुढे सांगितले की, तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे खूप महत्वाचे आहे. या तंदुरुस्तीमुळे आपण चालत राहतो आणि जर आपण थांबविले तर आपण अभिनेता नाही. म्हणूनच वेलनेस माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.
खरेतर सुनील शेट्टी लवकरच एका शोचे सूत्रसंचालन करतो आहे. हा एक रेडिओ शो आहे. हा शो बिग एफएफवर २१ दिन वेलनेस इन विथ सुनील शेट्टी या नावाने प्रसारीत झाला आहे. हा शो बिग एफएमवर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ५ ते ६ वेळात ऐकायला मिळणार आहे. याबद्दल सुनील शेट्टी म्हणाला की, रेडिओ खूप एक्सप्रेसिव्ह माध्यम आहे. रेडिओ खूप दूरपर्यंत जातो आणि हे एक खूप प्रभावशाली माध्यम आहे. माझे मत आहे की, जर देशाचे पंतप्रधान या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचू शकतात तर मला यापेक्षा दुसरे कोणते माध्यम चांगले वाटत नाही. त्यामुळे मी रेडिओचा आभारी आहे.