सुनील शेट्टीला दहशतवादी समजून पोलिसांनी केली होती अटक, आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 10:59 AM2017-11-04T10:59:47+5:302017-11-04T16:29:47+5:30

१९९२ मध्ये ‘बलवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा डॅशिंग अभिनेता सुनील शेट्टी नुकताच ‘जेंटलमॅन’ या चित्रपटात बघावयास मिळाला होता. ...

Sunil Shetty was arrested by the police in connection with the terror, and then ... | सुनील शेट्टीला दहशतवादी समजून पोलिसांनी केली होती अटक, आणि मग...

सुनील शेट्टीला दहशतवादी समजून पोलिसांनी केली होती अटक, आणि मग...

googlenewsNext
९२ मध्ये ‘बलवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा डॅशिंग अभिनेता सुनील शेट्टी नुकताच ‘जेंटलमॅन’ या चित्रपटात बघावयास मिळाला होता. बॉलिवूडचा अण्णा अशी ओळख असलेला सुनील आजही इंडस्ट्रीमधील सर्वात फिट अभिनेता म्हणून ओळखला जातो. २००२ मध्ये सुनील संजय गुप्ताच्या ‘कांटे’ या चित्रपटात काम करीत होता. चित्रपटात सुनील एका बाउंसर अण्णाची भूमिका साकारत होता. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सुनील शेट्टी त्याच्या संपूर्ण टीमसोबत अमेरिकेला गेला होता. सुनील सुरुवातीपासूनच त्याच्या फिटनेसवर अधिक लक्ष देत असल्याने, तो अमेरिकेत ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तेथून तो दररोज जीमसाठी जात असे. जीम हॉटेलपासून बºयाच अंतरावर असल्याने सुनील पहाटेच्या चार वाजताच जीमला जाण्यासाठी निघत असे. तसेच जीमवरूनच थेट सेटवर पोहोचत असे. 

एक दिवस सुनील शेट्टीला जीममध्ये खूप वेळ लागला. त्यामुळे तो सेटवर उशिरा पोहोचणार होता. परंतु सुनीलला सेटवर उशिरा जायचे नव्हते. त्यामुळे त्याने जीममध्येच त्याच्या भूमिकेचा ड्रेस परिधान केला. पुढे या लूकमध्ये तो सेटकडे निघाला. मात्र सुचलेली ही कल्पना त्याला अडचणीत घेऊन गेली. कारण जेव्हा अमेरिकन पोलिसांनी त्याला बघितले तेव्हा त्याला आतंकवादी समजून अटक केली. सुनील पोलिसांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु पोलीस त्याचे काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. 



जेव्हा याबाबतची माहिती सेटवरील इतर कलाकारांना कळाली तेव्हा सगळेच  सुनील शेट्टीला घेण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. संजय गुप्ता आणि अमिताभ बच्चन यांनी बºयाच प्रयत्नांनतर सुनील दहशतवादी नसल्याचे पोलिसांना पटवून दिले. या चित्रपटात सुनील शेट्टी व्यतिरिक्त संजय दत्त, अमिताभ बच्चन आणि कुमार गौरव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या घटनेनंतर सुनील आजही अमेरिकेत जाताना चार वेळा विचार करतो. 

Web Title: Sunil Shetty was arrested by the police in connection with the terror, and then ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.