सुनील शेट्टीचे बॉलिवूडमध्ये कमबॅक, दिसणार ह्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 06:00 AM2019-01-22T06:00:00+5:302019-01-22T06:00:00+5:30

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी गेल्या ५ वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर होता. आता तो पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Sunil Shetty's comeback in Bollywood, will appear in this movie | सुनील शेट्टीचे बॉलिवूडमध्ये कमबॅक, दिसणार ह्या सिनेमात

सुनील शेट्टीचे बॉलिवूडमध्ये कमबॅक, दिसणार ह्या सिनेमात

googlenewsNext
ठळक मुद्दे 'मरक्‍कड - द लॉयन ऑफ अरेबियन सी'मध्ये दिसणार सुनील शेट्टीसुनील साकारणार सोळाव्या शतकातील एका योद्धाची भूमिका


बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी गेल्या ५ वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर होता. आता तो पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या आगामी चित्रपटात सुनील शेट्टी झळकणार आहे. या सिनेमाचे नाव आहे 'मरक्‍कड - द लॉयन ऑफ अरेबियन सी'. या चित्रपटात सुनील सोळाव्या शतकातील एका योद्धाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट नेव्ही चीफ मोहम्मद अली उर्फ कुंजली मरक्‍कड यांच्या जीवनावर आधारित आहे.

'मरक्‍कड - द लॉयन ऑफ अरेबियन सी' हा चित्रपट अनेक भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात मल्याळम सुपरस्टार मोहनलालही झळकणार आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल १५० कोटींचे असणार आहे. सुनील आणि प्रियदर्शन यांचा हा ड्रीम प्रॉजेक्‍ट असून दोघेजण १० वर्षांनंतर पुन्हा एकत्रित काम करत आहे. सुनीलचा या सिनेमाचील लूक हा हॉलिवूडमधील ट्रॉयसारखा आहे.

सुनील शेट्टीने या चित्रपटातील आपला लूक सोशल मीडियावर शेअर करीत लिहिले की, 'मरक्कड – द लॉयन ऑफ अरेबियन सी'चे दिग्दर्शन माझे आवडते दिग्दर्शक प्रियदर्शन करत आहेत.' दरम्यान, मोहनलाल, प्रभुदेवा आणि सुनिल शेट्टी यांनी ८५ ते ९० दिवस रामोजी फिल्म सिटीत चित्रीकरण करणार आहेत. हा चित्रपट पाण्यावर आधारित असल्याने जुने वॉरशिप्ससह ऑर्टिफिशल समुद्रही तयार करण्यात येणार आहे. सुनील शेट्टीला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहणे तेही एका वेगळ्या अवतारात कमालीचे ठरणार आहे. 
 

Web Title: Sunil Shetty's comeback in Bollywood, will appear in this movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.