ड्रेस फिट झाला नाही म्हणून संतापला होता पती, करिश्मा कपूरला मारली होती थोबाडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 01:11 PM2020-11-16T13:11:39+5:302020-11-16T13:19:36+5:30
2003 साली करिश्माने संजय कपूर या बिझनेसमॅनसोबत लग्न केले आणि 2016 साली दोघांचा घटस्फोट झाला.
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर यांच्या नात्याची अखेर खूप वादग्रस्त राहिली. 2003 साली करिश्माने संजय कपूर या बिझनेसमॅनसोबत लग्न केले आणि 2016 साली दोघांचा घटस्फोट झाला. त्याआधी करिश्मा व संजय यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. बातम्यांच्या रूपात हा वाद चव्हाट्यावर आला होता. करिश्माने संजयवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. घटस्फोटासाठी दाखल अर्जात तिने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. एक किस्सा तर इतका धक्कादायक होता की, तो ऐकून प्रत्येकाला धक्का बसला होता. गरोदर असताना संजयने आपल्या आईला करिश्माच्या थोबाडीत मारण्यास सांगितले होते.
करिश्मा त्यावेळी प्रेग्नंट होती. प्रेग्नंसीदरम्यान तिचे वजन बरेच वाढले होते. प्रसूतीनंतर संजयने करिश्माला एक ड्रेस घालायला सांगितला. पण जाड झाल्यामुळे तो ड्रेस करिश्माला फिट झाला नाही. हे पाहून संजय करिश्मावर प्रचंड संतापला होता. इतका की, हिला (करिश्माला)एक थोबाडीत मार, असे तो आपल्या आईला म्हणाला होता.
करिश्माने संजयवर असे अनेक आरोप केले होते. आजारी मुलाला सोडून तो पोलो खेळायला गेल्याचा आरोपही तिने केला होता. संजय त्याच्या भावाला करिश्मावर नजर ठेवायला सांगायचा. लहान-सहान गोष्टींवरून हायपर व्हायचा आणि मारायचा. सासू सुद्धा तिला मारायची, असे आरोपही करिश्माने केले होते.
हा सगळा त्रास व छळ असह्य झाल्याने अखेर करिश्माने संजयला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर करिश्मा आई बबिता कडे येऊन राहू लागली. 201 6 साली दोघांनी घटस्फोट घेतला होता. पोटगीपोटी संजयन करिश्माला 10 कोटी रुपये आणि राहण्यासाठी एक बंगला दिला होता. सध्या संजय त्याच्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च सुद्धा करत आहे.
करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर जुडवा, राजा बाबू, हिरो नंबर 1, राजा हिंदुस्तानी, दुल्हन हम ले जाएंगे, हम साथ साथ है अशा अनेक सुपरहिट सिनेमात तिने काम केले आहे. बॉलिवूडपासून खूप काळ दूर राहिल्यानंतर करिश्माने नुकताच डिजिटल प्लॅटफॉर्म मधून कमबॅक केला आहे. तिने ‘मेंटलहूड’ या वेबसीरिजमध्ये काम केले.