-तर सनी देओल बनणार ‘खलनायक’! २५ वर्षांनंतर मिळाला दमदार रोल!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:08 PM2019-02-04T15:08:00+5:302019-02-04T15:11:19+5:30
अलीकडे आलेले सनीचे चित्रपट भलेही फ्लॉप होवोत, पण म्हणून सनीची डिमांड कमी झालीय, असे समजायचे कारण नाही. विश्वास बसत नसेल तर ही ताजी बातमी तुम्ही वाचायलाच हवी.
अभिनेता सनी देओलने वयाची साठी ओलांडलीय. पण सनीचा चार्म अजूनही कमी झालेला नाही. अलीकडे आलेले सनीचे चित्रपट भलेही फ्लॉप होवोत, पण म्हणून सनीची डिमांड कमी झालीय, असे समजायचे कारण नाही. विश्वास बसत नसेल तर ही ताजी बातमी तुम्ही वाचायलाच हवी.
होय, गेल्या काही दिवसांत सनीच्या आॅफिसात दिग्दर्शक- निर्मात्यांची ये-जा वाढली आहे. अनेकांकडे सनीसाठी दमदार भूमिका आहेत. अर्थात सनी एकापाठोपाठ एक स्क्रिप्ट रिजेक्ट करतोय. पण एक स्क्रिप्ट मात्र त्याला जाम आवडलीय. चर्चा खरी मानाल तर, अलीकडे सनीने सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मीची भेट घेतली.
आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत अनीस बज्मी यांनी वेलकम, वेलकम बॅक, सिंग इज किंग, रेडी, मुबारकां असे अनेक चित्रपट दिले आहेत. तूर्तास अनीस बज्मी सुपरहिट चित्रपट ‘आंखे’च्या सीक्वलवर काम करत आहेत. या चित्रपटाची स्क्रिप्ट फायनल झालीय आणि अमिताभ बच्चन यांनीही या चित्रपटासाठी होकार दिला आहे. या सीक्वलमध्ये विलेनच्या भूमिकेसाठी अनीस यांना गेल्या अनेक दिवसांपासून एका चेहºयाचा शोध होता. त्यांचा हा शोध सनीजवळ येऊन संपल्याचे कळतेय. होय, ‘आंखे 2’मध्ये विलेनच्या भूमिकेसाठी सनी एकदम परफेक्ट असल्याचे त्यांचे मत आहे. अलीकडे सनीने अनीस यांची भेट घेतली, ती याचसाठी.
सूत्रांचे मानाल तर, सनीला स्क्रिप्ट आवडलीय. अर्थात अद्याप सनीने यासाठी होकार दिलेला नाही. पण हा निगेटीव्ह रोल सनी सोडणार नाही, असा विश्वाय अनीस यांना वाटतोय.
सनी व अमिताभ बच्चन या जोडीने केवळ एकाच चित्रपटात काम केले. १९९४ मध्ये रिलीज झालेल्या ‘इंसानियत’मध्ये ही जोडी दिसली. विजय कौल यांनी लिहिलेला हा चित्रपट टोनीने दिग्दर्शित केला होता. ‘इंसानियत’नंतर पुन्हा एकदा अमिताभ व सनीची जोडी पुन्हा एकदा आली तर निश्चितपणे पडद्यावर धूम करणार. प्रतीक्षा आहे ती केवळ सनीच्या होकाराची.