सनी देओल-ऐश्वर्या रायचा 'तो' सिनेमा रिलीजच होऊ शकला नाही, कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 14:15 IST2024-11-30T14:14:33+5:302024-11-30T14:15:26+5:30

Sunny Deol Movie : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत, ज्यांचे चित्रीकरण झाले तरी ते चित्रपटगृहांपर्यंत पोहोचत नाही. असंच काहीसं सनी देओलच्या एका सिनेमासोबत घडले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, पण तो कधीच प्रदर्शित झाला नाही.

Sunny Deol-Aishwarya Rai's this movie could not be released, because you will be shocked to hear | सनी देओल-ऐश्वर्या रायचा 'तो' सिनेमा रिलीजच होऊ शकला नाही, कारण ऐकून व्हाल हैराण

सनी देओल-ऐश्वर्या रायचा 'तो' सिनेमा रिलीजच होऊ शकला नाही, कारण ऐकून व्हाल हैराण

अभिनेता सनी देओल(Sunny Deol)ने 'गदर २' (Gadar 2) सिनेमात अमिषा पटेल(Amisha Patel)सोबत दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. सनी देओलचे काही चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत, ज्यात जट्ट और लाहौर: १९४७ या चित्रपटाचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याचे शूट सुरू झालं पण तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. या चित्रपटात त्याच्यासोबत ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) होती.

सनी देओल आणि ऐश्वर्या रायचा थंडबस्त्यात गेलेल्या सिनेमाचं नाव आहे 'इंडियन' (Indian Movie). हा चित्रपट सनी देओलने २५ वर्षांपूर्वी साइन केला होता. याच चित्रपटातून ऐश्वर्या राय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट त्यावेळेचा जास्त बजेट असलेला सिनेमा होता. सनी आणि ऐश्वर्यावर एक गाणं देखील शूट करण्यात आले होते, ज्यावर १.७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र नंतर कोणत्यातरी कारणास्तव हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.

सनी देओलचा चित्रपट का रिलीज झाला नाही?
आप की अदालत या शोमध्ये सनी देओल म्हणाला, “मी स्वतः इंडियन हा चित्रपट बनवत होतो. ऐश्वर्या या चित्रपटाचा एक भाग होती आणि हा तिचा डेब्यू प्रोजेक्टही होता. आम्ही गाणी शूट केली होती, पण नंतर बजेटशी संबंधित समस्या निर्माण झाल्या आणि तो चित्रपट थंडबस्त्यात गेला. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, गदर २च्या ब्लॉकबस्टर यशानंतर, सनी पाजी लाहोर १९४७, बॉर्डर २ सारख्या चित्रपटांचा एक भाग आहे.

Web Title: Sunny Deol-Aishwarya Rai's this movie could not be released, because you will be shocked to hear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.