थिएटरमध्ये धुमाकूळ घातलेला 'गदर २' OTTवर कधी रिलीज होणार?, निर्माते म्हणाले-किमान....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:10 AM2023-08-22T11:10:15+5:302023-08-22T11:13:06+5:30
'गदर 2'च्या यशाने सर्वांचीच बोलती बंद केली.
बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2'चा (Gadar 2) बॉक्सऑफिसवरील धुमाकूळ अजूनही सुरुच आहे. ११ ऑगस्टला रिलीज झालेल्या 'गदर 2' ने १० दिवसातच ३०० कोटींचा टप्पा पार केला. 'गदर 2'च्या यशाने सर्वांचीच बोलती बंद केली. . २००१ साली ज्याप्रकारे 'गदर'ने इतिहास घडवला होता. अगदी तसाच प्रतिसाद 'गदर' च्या सिक्वलला मिळताना दिसतोय. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 377.20 कोटी रुपये झाले आहे.मात्र, ओटीटीच्या या युगात प्रेक्षकांचा एक भाग असा आहे जो या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहे.
एखादा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातल्यानंतर OTTवर रिलीज होतो. त्यामुळे प्रेक्षक आता गदर२ ची देखील ott वर यायची वाट बघतायेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'गदर 2' च्या OTT रिलीजसाठी प्रेक्षकांना बराच वेळ वाट पाहावी लागेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत आहे. चित्रपटाचा 400 कोटींकडे वाटचाल करत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी असलेला उत्साह पाहता चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दीर्घकाळ चालेल असे वाटते.
गदर 2 च्या निर्मात्याने एका मुलाखतीत सांगितले की, गदर 2 रिलीज झाल्यानंतर किमान दोन महिन्यांनी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. OTT रिलीजची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर थैमान घालू शकतो.
'गदर 2' चा धुमाकूळ बघता इतक्यात तरी बॉक्सऑफिसचे आकडे कमी होतील असं वाटत नाही. 'गदर 2' हिट होण्याचं कारण म्हणजे हा सिनेमा फक्त सिनेमा नाही तर लोकांसाठी ते एक इमोशन आहे. तसंच मेकर्सने जून महिन्यात 'गदर एक प्रेम कथा' पुन्हा थिएटर्समध्ये रिलीज केला होता. याचाही सिनेमाला फायदा झाला. सध्या प्रेक्षकांमध्ये केवळ सनी पाजीची क्रेझ दिसून येतेय.