सनी देओल व हेमा मालिनी संसदेतही नसतील ‘साथ -साथ’, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 11:14 AM2019-05-28T11:14:15+5:302019-05-28T11:15:07+5:30

सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूरमधून जिंकले तर धर्मेन्द्र यांच्या पत्नी हेमा मालिनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथून विजयी झाल्यात. साहजिकच या विजयानंतर दोघेही खासदार या नात्याने संसदेत आपआपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना दिसतील. पण संसद सभागृहात सनी आणि हेमा दोघेही एकमेकांच्या शेजारी बसणार नाहीत.

sunny deol and hema malini will not be sitting together in parliament | सनी देओल व हेमा मालिनी संसदेतही नसतील ‘साथ -साथ’, जाणून घ्या कारण

सनी देओल व हेमा मालिनी संसदेतही नसतील ‘साथ -साथ’, जाणून घ्या कारण

googlenewsNext
ठळक मुद्देहेमा मालिनी दुस-यांदा मथुरेमधून निवडणूक लढल्या. २०१४ मध्ये त्या इथून मोठया मताधिक्क्याने विजयी झाल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेते सनी देओल आणि अभिनेत्री हेमा मालिनी दोघेही लोकसभा निवडणुकीत विजयी झालेत. दिग्गज अभिनेते धर्मेन्द्र यांचा मुलगा सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूरमधून जिंकले तर धर्मेन्द्र यांच्या पत्नी हेमा मालिनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथून विजयी झाल्यात. साहजिकच या विजयानंतर दोघेही खासदार या नात्याने संसदेत आपआपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना दिसतील. पण संसद सभागृहात सनी आणि हेमा दोघेही एकमेकांच्या शेजारी बसणार नाहीत. याचे कारण, दोघांच्या नात्यातील मतभेद नाही तर वेगळेच आहे.

याचे कारण म्हणजे, हेमा मालिनी या ज्येष्ठ खासदार आहेत. त्यामुळे त्या संसदेत पुढच्या रांगेतील आसनावर बसतील. याऊलट सनी देओल नवनिर्वाचित खासदार आहेत. त्यामुळे त्यांना सभागृहातील मागच्या रांगेतील जागा मिळेल. सनी देओल पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले अन् पहिल्याच वेळी निवडून आलेत.  

पंजाबमधील गुरुदासपूरमधून दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या जागी भाजपने अभिनेता सनी देओल यांना लोकसभेसाठी मैदानात उतरवले होते. पुलवामा हल्ल्यानंतर, बालाकोट एअरस्ट्राइक झाल्यानंतर भाजपने राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे वातावरण पाहात सनी देओल यांना उमेदवारी दिली होती. सनी देओल यांच्या सिनेमांमधून ही प्रखर राष्ट्रवादाची भावना दिसते. त्यामुळे सनी देओल यांची ही प्रतिमा त्यांच्या विजयाचे कारण ठरली.

हेमा मालिनी दुस-यांदा मथुरेमधून निवडणूक लढल्या. २०१४ मध्ये त्या इथून मोठया मताधिक्क्याने विजयी झाल्या होत्या. २०१४ मध्ये हेमा मालिनी आरएलडीच्या जयंत चौधरी यांचा पराभव करुन पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या.

Web Title: sunny deol and hema malini will not be sitting together in parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.