सनी देओलने 'गदर 2' च्या यशाचं श्रेय दिलं 'खास' व्यक्तीला, म्हणाला, "तिच्या येण्याने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 04:35 PM2023-08-16T16:35:52+5:302023-08-16T16:36:52+5:30

सध्या जिकडे तिकडे सनी पाजीचीच हवा आहे.

Sunny Deol attributes the success of 'Gadar 2' to a daughter in law drisha acharya | सनी देओलने 'गदर 2' च्या यशाचं श्रेय दिलं 'खास' व्यक्तीला, म्हणाला, "तिच्या येण्याने..."

सनी देओलने 'गदर 2' च्या यशाचं श्रेय दिलं 'खास' व्यक्तीला, म्हणाला, "तिच्या येण्याने..."

googlenewsNext

सनी देओलसाठी (Sunny Deol) हे वर्ष खूपच खास आहे. 2001 साली आलेल्या ब्लॉकबस्टर 'गदर' (Gadar) सिनेमाचा सिक्वल आला जो सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सध्या जिकडे तिकडे सनी पाजीचीच हवा आहे. 'गदर 2' (Gadar 2) ने पाचच दिवसात २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यासोबत त्याने बाहुबलीचाही विक्रम मोडला आहे. सगळेच चाहते सनी देओलचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे सनीने 'गदर 2' च्या यशाचं श्रेय एका खास व्यक्तीला दिलं आहे.

सनी देओलचा मुलगा करण देओल १८ जून रोजी लग्नबंधनात अडकला. त्याने द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधली. यावेळी संपूर्ण देओल कुटुंब पहिल्यांदाच एकत्र कॅमेऱ्यात कैद झालं. हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली मात्र लग्नात सामील झाल्या नाहीत. एकीकडे मुलाच्या लग्नाचा आनंद आणि आता दुसरीकडे चित्रपट सुपरहिट झाल्याचा आनंद काही वेगळाच आहे. सनी देओलने 'गदर 2'च्या यशाचं श्रेय सून द्रिशा आचार्यला दिलं आहे. माध्यम रिपोर्ट्सनुसार, देओल कुटुंबातील एका निकटवर्तियाने सांगितले, 'सनी देओलला असे वाटते की करण देओलची पत्नी आणि घरची लक्ष्मी द्रिशा आचार्य परिवारासाठी लकी चार्म ठरली आहे.' 

'गदर 2' च्या यशाचा आणखी एक फायदा म्हणजे या सिनेमाने सावत्र बहीण भावंडांना अनेक वर्षांनी एकत्र आणलं. हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने सावत्र भाऊ सनी देओलच्या सिनेमाचं यश सेलिब्रेट केलं. तिने कुटुंबासाठी खास स्क्रीनिंग ठेवली. मात्र यात हेमा मालिनी उपस्थित राहिल्या नाहीत.

तारा सिंग आणि सकिना यांच्या जोडीने पुन्हा एकदा गदरमध्ये आपली जादू दाखवली आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल या जोडीला पूर्वीसारखेच प्रेम मिळाले आहे. प्रत्येकाला ही जोडी पुन्हा बघायची आहे. चित्रपटाने 15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर पाचव्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईसह, 'गदर 2' चित्रपटाचे देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन आता 228.58 कोटी रुपयांवर गेले आहे. चित्रपटाचे कलेक्शन आणि मिळालेले प्रेम पाहून सनी देओल भारवून गेला  आहे.

Web Title: Sunny Deol attributes the success of 'Gadar 2' to a daughter in law drisha acharya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.