सनी देओल दारू पितो का? 'त्या' व्हायरल व्हिडीओबाबत स्वत: थेटच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 15:17 IST2023-12-15T15:13:40+5:302023-12-15T15:17:17+5:30
सनी देओलचा मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध चालतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.

मद्यधुंद अवस्थेतील 'त्या' व्हायरल व्हिडीओवर सनी देओलने सोडलं मौन
बॉलिवूडचा 'तारा सिंह' अर्थात अभिनेता सनी देओल कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. ‘गदर 2’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्यांच्या लोकप्रियतेत भर पडली. यातच सनी देओलचा रस्त्याच्या मधोमध चालतानाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. अनेकांनी त्याला दारू पिण्यावरून सुनावलं. यानंतर सनी देओलने यानंतर त्या व्हिडिओची सत्यता स्वत: सर्वांसमोर आणली आणि चर्चांना पूर्णविराम दिला. आता यातत सनी देओलने दारूबद्दल आपलं मत व्यक्त केलं.
सनी म्हणाला, 'हे एका शूटचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे सर्वांनी शांत व्हावं. जर मला दारू प्यायची असेल तर मी रस्त्यावर ऑटोरिक्षामध्ये हे करेल का. पण खरे तर मी दारू पीत नाही. हा खरा व्हिडीओ नसून चित्रपटाच्या शूटिंगचा आहे'. सनी देओलचा हा व्हिडीओ त्याच्या आगामी 'सफर' चित्रपटाच्या शूटिंगचा आहे. 'सफर' हा चित्रपट सनी देओल याने 'गदर २'च्या आधीच साईन केला होता.
Afwaahon ka ‘Safar’ bas yahin tak 🙏🙏#Shooting#BTSpic.twitter.com/MS6kSUAKzL
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 6, 2023
‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या या मुलाखतीत सनी म्हणाला, 'जेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो तेव्हा मी एकदा दारू प्यायलो होते. एक तर ती इतकी कडू, त्यात तिचा इतका दुर्गंध, प्यायलानंतर डोकं सुद्धा दुखायला लागतं, त्यामुळे ते का प्यावं, हे मला समजत नाही. म्हणूनच मला दारू आवडत नाही आणि मी पुन्हा कधीही प्यायलो नाही'. दारू किंवा अन्य कुठलंही व्यसन नसल्याने ६५व्या वर्षीही सनी देओलचा कमालीचा फिटनेस आहे.