'जमाल कुडु' गाण्यावर सनी पाजीने बनवली मजेशीर रील, बॉबी देओल कमेंट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 12:05 PM2023-12-27T12:05:10+5:302023-12-27T12:05:41+5:30

'जमाल कुडु' गाण्यावरील रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता सनी देओललाही या गाण्याची भुरळ पडली आहे. 

sunny deol reel video on jamal kudu song animal movie bobby deol commented | 'जमाल कुडु' गाण्यावर सनी पाजीने बनवली मजेशीर रील, बॉबी देओल कमेंट करत म्हणाला...

'जमाल कुडु' गाण्यावर सनी पाजीने बनवली मजेशीर रील, बॉबी देओल कमेंट करत म्हणाला...

'ॲनिमल' सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. या सिनेमातील 'जमाल कुडु' गाण्यावरील रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता सनी देओललाही या गाण्याची भुरळ पडली आहे. 

बॉबी देओलच्या 'जमाल कुडु' गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. रील्सवरही हे गाणं ट्रेंडिंग आहे. सनी देओलनेही या गाण्यावर मजेशीर रील व्हिडिओ बनवला आहे. सनी पाजीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो हातात टेडी घेऊन 'जमाल कुडु' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सनी देओलच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. तर सनी पाजीचा जमाल कुडु गाण्यावरील भन्नाट रील पाहून बॉबी देओलही अवाक् झाला आहे. त्याने देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे. सनी देओलच्या जमाल कुडु गाण्यावरील व्हिडिओवर बॉबी देओलने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तर अमिषा पटेलने कमेंट करत "तुम्ही कुठल्याही टेडी बिअरपेक्षा क्यूट आहात," असं म्हटलं आहे. 

दरम्यान, १ डिसेंबरला प्रदर्शित झालेला 'ॲनिमल' अजूनही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या सिनेमात रणीबरबरोबर बॉबी देओल, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाने आत्तापर्यंत ५०० कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. 

Web Title: sunny deol reel video on jamal kudu song animal movie bobby deol commented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.