'गदर 2' मुळे नशीबच पालटलं, चाहत्यांनी पुन्हा पाहिले सनी देओलचे जुने चित्रपट; म्हणाला,...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 08:54 AM2023-12-18T08:54:57+5:302023-12-18T08:55:35+5:30

सध्या चाहते माझे जुने चित्रपट पाहत आहेत.

Sunny deol s success after Gadar 2 fans watching his old films again actor replies | 'गदर 2' मुळे नशीबच पालटलं, चाहत्यांनी पुन्हा पाहिले सनी देओलचे जुने चित्रपट; म्हणाला,...

'गदर 2' मुळे नशीबच पालटलं, चाहत्यांनी पुन्हा पाहिले सनी देओलचे जुने चित्रपट; म्हणाला,...

'गदर 2' च्या यशामुळे अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) भाव वाढला आहे. गेल्या काही काळापासून सतत फ्लॉप ठरत असलेल्या सनीने 'गदर 2' मधून जबरदस्त कमबॅक केले. यावर्षाचा हा ब्लॉकबस्टर हिट ठरला. थिएटरमध्ये अक्षरश: धिंगाणा झाला. 'गदर 2' आता चाहते सनीचे जुने चित्रपटही पुन्हा पाहायला लागले आहेत. यावर सनीने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत सनी देओल म्हणाला,"सध्या चाहते माझे जुने चित्रपट पाहत आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट ती काय असेल. याचा अर्थ नवी पिढी माझ्यासोबत आहे. नाहीतर मला नव्या पिढीशी जुळवून घेणं खूप कठीण गेलं असतं. त्यांनी मला 'गदर 2' मध्ये पाहिलं, मी कसं काम केलं ते पाहिलं. आता ते माझे जुने चित्रपट पाहत आहेत."

'गदर 2' ने जगभरात तब्बल 500 कोटींचा व्यवसाय केला. 2000 साली रिलीज झालेल्या 'गदर' सिनेमाचाच हा सिक्वेल होता. यामधून पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी तारासिंगचा जबरदस्त अंदाज बघायला मिळाला. तर तारासिंग आणि सकीनाच्या जोडीने प्रेक्षकांना पुन्हा प्रेमात पाडलं. सध्या सनी आगामी 'सफर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा नशेत जुहूच्या रस्त्यावर फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

सनी देओल लवकरच आमिर खानच्या बॅनरअंतर्गत 'लाहौर 1947' मध्येही काम करणार आहे. शिवाय नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये तो हनुमानाच्या भूमिकेत असल्याच्या चर्चा आहे. तसेच 'बॉर्डर 2','गदर 3' हे सिनेमेही बनणार असल्याच्या चर्चा आहेत.

Web Title: Sunny deol s success after Gadar 2 fans watching his old films again actor replies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.