मुलाच्या लग्नात सनीने काढली पाहुण्यांची लाज; गेस्टने केलेल्या 'या' कृतीमुळे भडकला तारासिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 05:59 PM2023-09-12T17:59:39+5:302023-09-12T18:00:01+5:30

Sunny deol: सनी देओलने चारचौघांमध्ये त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांना फटकारलं होतं.

sunny-deol-scolded-his-relatives-for-recording-videos-at-karan-deol-and-drisha-acharya-wedding-ceremony | मुलाच्या लग्नात सनीने काढली पाहुण्यांची लाज; गेस्टने केलेल्या 'या' कृतीमुळे भडकला तारासिंग

मुलाच्या लग्नात सनीने काढली पाहुण्यांची लाज; गेस्टने केलेल्या 'या' कृतीमुळे भडकला तारासिंग

googlenewsNext

सध्या कलाविश्वात सनी देओलच्या (Sunny deol) नावाची प्रचंड चर्चा सुरु आहे. तब्बल २२ वर्षानंतर त्याचा 'गदर 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. नुकताच गदर २ ने ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे बॉलिवूडचा तारासिंग अर्थात सनी देओल चर्चेत आहे. अभिनयामुळे चर्चेत येणारा सनी बऱ्याचदा त्याच्या रागीट स्वभावामुळेही चर्चेत येत असतो. इतकंच नाही तर त्याने करणच्या लग्नातही रागाच्या भरात आलेल्या पाहुण्यांचा अपमान केला. नुकताच एका मुलाखतीत त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे.

अलिकडेच सनी देओलने रजत शर्माच्या आप की अदालत या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने त्याच्या मुलाच्या करणच्या लग्नातील एक किस्सा सांगितलं. रागाच्या भरात त्याने चक्क पाहुण्यांची लाज काढली.

“घरात लग्नाचा माहौल होता.  त्यामुळे बरेच पाहुणे आधीच आमच्या घरी राहायला आले होते. तेव्हा मी पाहिलं की काही पाहुणे हे घरात होणाऱ्या कार्यक्रमांचे फोटो, व्हिडीओ काढत आहेत. इतंकच नाही तर ते सगळं सोशल मीडियावरही शेअर करत आहे. हे सगळं पाहून मला खूप राग आला आणि मी रागाच्या भरात सगळ्यांना फटकारलं.  हे सगळं करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? असं थेट मी त्यांना विचारलं. पण, यानंतरही काही जण पुन्हा तेच करत होते. तेव्हा मला समजलं की आपण प्रत्येकाला अडवू शकत नाही.  त्यामुळे मग मी शांत बसलो", असं सनी देओल म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "जेव्हा सोशल मीडिया आलं तेव्हा रिकामटेकड्या लोकांच्या हाती एक साधन आलं. त्यांची काही ओळख नसते. ना चेहरा असतो. त्यामुळे ते काहीही करत बसतात. कोणालाही काहीही बोलतात. ज्या व्यक्तीबद्दल आपण इतकं वाईट बोलतोय, त्याला किती दु:ख होईल याचा विचार ते करत नाहीत. ते फक्त स्वत:चा विचार करतात. स्वत:ला गंमत वाटावी म्हणून काहीही लिहितात.”

दरम्यान, सनी देओलचा मोठा मुलगा करण याचा १८ जून २०२३ रोजी विवाहसोहळा संपन्न झाला. करणने त्याची गर्लफ्रेंड दृशा आचार्य हिच्याशी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्यात कलाविश्वातील काही मोजकी मंडळी आणि कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर या लग्नसोहळ्यात हेमा मालिनी आणि तिच्या लेकी इशा देओल, आहाना देओल या अनुपस्थित असल्यामुळे मोठ्या चर्चेला उधाण आलं होतं.
 

Web Title: sunny-deol-scolded-his-relatives-for-recording-videos-at-karan-deol-and-drisha-acharya-wedding-ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.