बालिशपणा! शाहरुखसोबतच्या ३० वर्षांपूर्वीच्या वादावर सनी देओल पहिल्यांदाच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 13:14 IST2023-09-10T13:07:43+5:302023-09-10T13:14:12+5:30
सनी देओलचे हरवलेले स्टारडम 'गदर 2' मुळे परत आले आहे.

बालिशपणा! शाहरुखसोबतच्या ३० वर्षांपूर्वीच्या वादावर सनी देओल पहिल्यांदाच बोलला
30 वर्षांपूर्वी आलेला 'डर' सिनेमा आठवत असेलच. 'तू है मेरी किरण' हे त्यातलं गाणं तर आजही अनेक ठिकाणी लावलं जातं. सिनेमात सनी देओल (Sunny Deol) आणि जुही चावला (Juhi Chawla) मुख्य भूमिकेत होते तर शाहरुख खानने (Shahrukh Khan) व्हिलनची भूमिका साकारली होती. यश चोप्रा यांचा हा सिनेमा सुपरहिट झाला होता. मात्र या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यात मोठा वाद झाला होता. सनी देओल तर इतका भडकला की त्याने नंतर कधीच यश चोप्रा आणि शाहरुखबरोबर काम केलं नाही. आता नुकतंच 'गदर 2' च्या यशानिमित्त दोघंही सनी आणि शाहरुखने सर्व विसरुन पुन्हा गळाभेट घेतली.
सनी देओलचे हरवलेले स्टारडम 'गदर 2' मुळे परत आले आहे. नुकताच तो 'आप की अदालत' शो मध्ये आला होता. यावेळी त्याला शाहरुख सोबतच्या जुन्या वादाविषयी विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, 'नक्कीच, नक्कीच बघा तो जमाना होता जेव्हा त्या सगळ्या गोष्टी झाल्या. काळानुसार गोष्टी विसरल्या जातात आणि नंतर कळतं की असं नव्हतं व्हायला पाहिजे. तो बालिशपणा होता हे नक्की. त्यानंतर मी आणि शाहरुख अनेकदा भेटलो बोललो आहे. अनेक गोष्टींवर बातचीत केली आहे. सिनेमांबाबतीत चर्चा केली आहे. आता सुद्धा माझा सिनेमा आल्यावर तो पूर्ण कुटुंबासोबत माझा सिनेमा बघत होता. त्याने मला फोन केला. आता गोष्टी सुधारल्या आहेत. सगळं ठीक आहे.'
बॉलिवूड पार्ट्यांना न जाण्याचं सांगितलं कारण
सनी देओल फिल्मइंडस्ट्रीतील लोकांसोबत फारसा मिळून मिसळून राहत नाही असं बोललं जातं. ना की तो कोणत्या पार्टीजना जातो. यावर सनी म्हणाला, 'मी मॉर्निंग पर्सन आहे. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठतो. सुरुवातील मी पार्ट्यांना जात होतो. तिथे वरिष्ठ कलाकार असायचे. त्यांना दारु चढायची. एक पकडायचा, मग दुसरा पकडायचा मग तिसरा...आणि मग मलाही चढायची. यानंतर तुम्ही काहीच अर्थपूर्ण संभाषण करु शकत नाही. पण तो जमाना वेगळाच होता.'