सनी देओल शेतकरी आंदोलनावर बोलले; नेटकरी म्हणाले, धरम पुतर से ये उम्मीद ना थी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 04:00 PM2020-12-07T16:00:21+5:302020-12-07T16:00:45+5:30
अनेकांनी सनी देओल यांना दुटप्पी, डिप्लोमॅटिक म्हटले. अनेकांनी यावरून मीम्सही शेअर केले.
भाजपा खासदार आणि अभिनेता सनी देओल यांनी रविवारी स्टेटमेंट ट्विट करत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदा प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘ हा शेतकरी आणि सरकारमधील मुद्दा आहे. त्यामुळे या मुद्द्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करु नये,’असे ट्विट सनी देओल यांनी केले. मात्र लोकांना ही प्रतिक्रिया पचनी पडली नाही. मग काय, सनी देओल सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झाले.
अनेकांनी सनी देओल यांना दुटप्पी, डिप्लोमॅटिक म्हटले. अनेकांनी यावरून मीम्सही शेअर केले. सनीजी अब बोले, चलो कुछ तो बोले, असे म्हणत एका युजरने सनी देओल यांना डिवचले. ‘शेतकरी आपली लढाई स्वत: लढेल पाजी, कदाचित तुमच्या हाडांमध्ये पाणी भरलेय,’ अशी कमेंट केली.
किसानों के खिलाफ बोलकर इन्होंने साबित कर दिया, कि हैंडपंप फर्जी उखाड़ा था जो फिल्मी सीन से ज्यादा कुछ नहीं।😂😂
— Deepak Bisht (@DeepakKbisht143) December 6, 2020
#SunnyDeol#FarmersProstest#wearewithfarmers#BJPfailspic.twitter.com/90zZU9Tr9U
— ᵇᵗˢBE⁷◴₁₃ (life goes on)🧚🏻♀ (@AnjaliThakur202) December 7, 2020
#FarmerPolitics#BharatBandh#FarmersWithModi#FarmerPolitics#नहीं_चाहिए_भाजपा#FarmerProtest#COVID19#IndiaSupportFarmerProtest#TakeBackFarmLaws#FarmersWithPmModi@iamsunnydeol@BJP4India
— MissMeme (@Miss_Meme01) December 7, 2020
Sunny Deol : I stand with farmers and BJP
so basically #SunnyDeol be like : pic.twitter.com/pbId9DuyYr
धरम पुतर से ये उम्मीद ना थी!! कतई न थी!!
— Ankit Patel (@OtPatel) December 6, 2020
काय म्हणाले सनी देओल?
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 6, 2020
माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, या आंदोलनाचा मुद्दा हा शेतकरी आणि सरकारमधील आहे. त्यामुळे या मुद्द्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करु नये. कारण आपापसात चर्चा करुन या मुद्द्यावर तोडगा निघणार नाही. मला हेदेखील चांगलंच माहित आहे की काही जण या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून या आंदोलनामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्येशी काहीही घेणे देणे नाहीये. ते केवळ संधीसाधू आहेत, असे सनी देओल म्हणाले. मी आणि माझा पक्ष शेतकऱ्यांसोबत आहोत आणि कायम मी त्यांच्या पाठिशी असेन. आपल्या सरकारने कायम शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे, सरकार त्यांच्याशी नीट चर्चा करुन योग्य तो तोडगा काढतील, असेही ते म्हणाले.