Shahrukh ला टक्कर देण्यासाठी Sunny Deol ची जबरदस्त चाल! कमाई वाढविण्यासाठी आखला मोठा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 22:40 IST2023-09-14T22:38:43+5:302023-09-14T22:40:30+5:30
अद्याप 'गदर 2' शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाचाही विक्रम मोडू शकलेला नाही.

Shahrukh ला टक्कर देण्यासाठी Sunny Deol ची जबरदस्त चाल! कमाई वाढविण्यासाठी आखला मोठा प्लॅन
शाहरुख खानचा 'जवान' प्रदर्शित झाल्यापासून सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाच्या कमाईला काहीसा ब्रेक लागला आहे. अद्याप 'गदर 2' शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाचाही विक्रम मोडू शकलेला नाही. अशातच आता 'गदर 2' च्या मेकर्सनी चित्रपटाच्या तिकिटांवर बम्पर ऑफर द्यायला सुरूवात केली आहे. त्यांनी तिकिटाचे दर मोठ्या प्रमाणावर कमी केले आहेत.
शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठान'ने बॉक्स ऑफिसवर एकूण 540.51 कोटींचे कलेक्शन केले होते. तर सनी देओलच्या गदर-2 ने अद्याप या आकड्याला स्पर्श केलेला नाही. तर दुसरीकडे शाहरुखच्या 'जवान'चाही बॉक्स ऑफिसवर दबदबा दिसत आहे. यामुळे 'गदर 2' च्या मेकर्सनी चित्रपटाची कमाई कायम राहावी यासाठी तिकिटाचे भाव 150 रुपये केले आहेत.
मेकर्सनी केली घोषणा -
'गदर 2' च्या तिकिटांची किंमत कमी केल्याची माहिती मेकर्सनी स्वतःच इंस्टाग्रामच्या माध्यमाने दिली आहे. यासोबतच, 'अशी संधी पुन्हा येणार नाही, उशीर करू नका'! आपले तिकीट आता केवळ 150 रुपयांत बुक करा. 15 सप्टेंबर पासून याचा लाभ घ्या आणि आपले तिकीट बुक करा.