​‘पेटा’साठी सनी लिओनी अन् तिचा पती डेनियल वेबर झालेत ‘न्यूड’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 10:35 AM2017-11-28T10:35:06+5:302017-11-28T16:06:32+5:30

सनी लिओनी सध्या जोरात आहे. पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी सनी प्राण्यांवर प्रचंड प्रेम करते. ...

Sunny Leone and her husband Danielle Weber are 'Nude' for 'PETA' | ​‘पेटा’साठी सनी लिओनी अन् तिचा पती डेनियल वेबर झालेत ‘न्यूड’!!

​‘पेटा’साठी सनी लिओनी अन् तिचा पती डेनियल वेबर झालेत ‘न्यूड’!!

googlenewsNext
ी लिओनी सध्या जोरात आहे. पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी सनी प्राण्यांवर प्रचंड प्रेम करते. गेल्या अनेक वर्षांपासून ती ‘पेटा’ या प्राण्यांसाठी काम करणा-या संघटनेशी जुळली आहे. पेटा प्राणी हित आणि संरक्षणासाठी काम करणारी संस्था आहे. आता सनीने ‘पेटा’साठी एक न्यूड फोटोशूट केले आहे. सनी यात पती डेनियल वेबरसोबत दिसतेय.being comfortable in your skin and letting animals be comfortable in theirs’, असा मोलाचा संदेश सनीने यामाध्यमातून दिला आहे.   दरवर्षी शेकडो हजारो प्राण्यांची कातडी मिळवण्यासाठी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात. हे थांबवायची वेळ आलीयं, असेच सनी या फोटोशूटद्वारे सांगतेय. 



सनीप्रमाणेच सनीचा पती डेनियल वेबर हा सुद्धा अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत स्टार राहुन चुकला आहे. २०११ मध्ये दोघांनीही लग्न केले होते. यानंतर दोघांनीही पॉर्न इंडस्ट्रीला राम राम ठोकला. सनीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. तर डेनियल तिचा बिझनेस मॅनेजर बनला. त्यामुळेच सनी बॉलिवूडमधील आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय पती डेनियलला देते. डेनियलच्या परवानगीशिवाय सनी कुठलाही चित्रपट साईन करत नाही. 

ALSO READ : ​सनी लिओनीने असा घेतला मस्करीचा बदला! हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाचं हवा!!

सनी व डेनियल सर्वप्रथम लॉस वेगासच्या एका रेस्टारंटमध्ये भेटले. डेनियल तिथे आपल्या बँडसोबत शो करण्यासाठी आला होता तर सनी आपल्या मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी तिथे पोहोचली होती. सनीला पाहताच डेनियल तिच्या प्रेमात पडला. सनी रेस्टारंटमध्ये बसली होती. मग काय, डेनियल तिच्या टेबलापाशी गेला आणि तिचे नाव विचारून परतला. यानंतर सनी त्या रेस्टारंटमध्ये पोहोचली की, एक फुलांचा गुच्छ तिला मिळायचा. अर्थातच हा पुष्पगुच्छ डेनियलने पाठवलेला असायचा. अशी दोघांची प्रेमकथा बहरली आणि पुढे डेनियल व सनीने लग्नाचा निर्णय घेतला.

Web Title: Sunny Leone and her husband Danielle Weber are 'Nude' for 'PETA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.