गलती से मिस्टेक़..! अखेर सनी लिओनी मागितली त्याची माफी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 03:31 PM2019-08-02T15:31:57+5:302019-08-02T15:32:11+5:30
बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी नुकतीच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात एक आयटम नंबर करताना दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. मात्र या चित्रपटाच्या एका सीनमुळे सनी लिओनी खूपच चर्चेत आली.
ठळक मुद्देकॉलचे हे प्रकरण सुरु झाले तर ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटातील एका सीनपासून. ‘अर्जुन पटियाला’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी नुकतीच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात एक आयटम नंबर करताना दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. मात्र या चित्रपटाच्या एका सीनमुळे सनी लिओनी खूपच चर्चेत आली. होय, ‘अर्जुन पटियाला’च्या एका सीनमध्ये सनी पोलीस अधिका-याला आपला फोन नंबर सांगते. सनीच्या चाहत्यांनी तो नंबर सनीचा असल्याचे गृहित धरले आणि त्यांनी त्या नंबरवर फोन, मेसेज करण्यास सुरुवात केली. पण हा नंबर निघाला दिल्लीच्या पुनीत अग्रवालचा. पुनीत अग्रवाल सनीच्या नावाने येणा-या असंख्य कॉलमुळे इतका वैतागला की, त्याने थेट पोलिसांत धाव घेतली.
या सगळे प्रकरण चांगलेच गाजले. सनीपर्यंत हे प्रकरण गेले आणि तिने पुनीतची माफी मागितली. ‘कुणाला त्रास देण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. पुनीतला मजेदार कॉल आले असतील, अशी आशा करते,’असे ती म्हणाली.
नेमके काय झाले
कॉलचे हे प्रकरण सुरु झाले तर ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटातील एका सीनपासून. ‘अर्जुन पटियाला’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यात सनी कॅमिओ रोलमध्ये आहे. या चित्रपटात सनी एका पोलिस कर्मचाºयाला तिचा मोबाईल नंबर सांगते. पण योगायोगाने हा मोबाईल नंबर दिल्लीतील एका खासगी कंपनीत काम करणाºया सीनिअर एक्झिक्युटिव्हचा निघाला. पुनीत अग्रवाल त्याचे नाव. यानंतर देशातूनच नाही तर विदेशातून पुनीतच्या मोबाईलवर कॉल येण्याचा ‘सिलसिला’ सुरु झाला. पुनीतला पहिला फोन कॉल आला. हा कॉल उचलताच पलीकडच्या व्यक्तिने अश्लिल बोलणे सुरु केले. तुला हा नंबर कुठून मिळाला, असे पुनीतने विचारल्यावर खुद्द सनी लिओनीनेच ‘अर्जुन पटियाला’मध्ये हा नंबर सांगितल्याचे पलीकडून बोलणाºया व्यक्तिने त्याला सांगितले. तेव्हा कुठे पुनीतला याप्रकाराबद्दल कळले. अर्थात त्याचे कॉल थांबले नाहीत. त्याच्या मोबाईल कॉल्समुळे तोच नाही तर त्याच्यासोबत काम करणारेही वैतागले. इतके की, कंपनीने हे थांबले नाही तर तुला नोकरीवरून काढू अशी तंबी दिली.