'शांताबाई' या लोकप्रिय गाण्यावर चक्क थिरकणार सनी लिओनी, दिसणार या मराठी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 10:46 AM2022-03-19T10:46:55+5:302022-03-19T10:47:18+5:30

यापूर्वी सनी लिओनी (Sunny Leone)ने 'बॉईज' या मराठी चित्रपटाच्या 'कुठं कुठं जायच हनिमूनला' या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यानंतर आता ती दुसऱ्या गाण्यावर ठुमके लगावताना दिसणार आहे.

Sunny Leone dance on popular marathi song 'Shantabai' | 'शांताबाई' या लोकप्रिय गाण्यावर चक्क थिरकणार सनी लिओनी, दिसणार या मराठी चित्रपटात

'शांताबाई' या लोकप्रिय गाण्यावर चक्क थिरकणार सनी लिओनी, दिसणार या मराठी चित्रपटात

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिने आपल्या कौशल्याने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केल्यानंतर आता प्रादेशिक चित्रपटाकडे आपला मोर्चा वळवला. तेलगू. तमीळ, मल्याळम आणि कन्नड प्रेक्षकांना उत्कृष्ट अदा दाखवल्यांनतर सनी मराठीमध्ये दुसऱ्यांदा गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. यापूर्वी सनीने बॉईज या मराठी चित्रपटाच्या 'कुठं कुठं जायच हनिमूनला' या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मन जिंकली होती. लवकरच सनी लिओनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट आमदार निवासामध्ये 'शांताबाई' या गाण्यावर ठुमके लगावताना दिसणार आहे. 

आगामी आमदार निवास या चित्रपटाच्या निमित्ताने सनी लिओनी आपल्याला आधुनिक शांताबाईच्या रूपात भेटीला येणार आहे. या मराठी आयटम साँगची बॉलिवूडने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा रंगू लागली आहे. आधुनिक 'शांताबाई'चा अवतार पाहायला सगळेच उत्सुक आहेत. २०१५ मध्ये शांताबाई या गाण्याने महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगात अक्षरश: धुमाकुळ घातला होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला ८५ कोटींहून जास्त व्हुज असून सुमीत म्युझिकच्या मालकीचे हे गाणे आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले असून महाराष्ट्राची आधुनिक 'शांताबाई' म्हणून सनी लिओनी दिसणार आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवाने या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांचे मूळ गीत असलेले हे गाणे नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर घातली आहे. 'शांताबाई' या गाण्याची भव्यता आणि गावरान बाज असलेल्या 'सनी लिओनी'ची दिलखेच अदांनी प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही तर या शांताबाई या गाण्याच्या निमित्ताने गायक संजय लोंढे याना एक मोठी संधी संजीवकुमार राठोड यांनी दिली आहे. सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर 'आमदार निवास' भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा चित्रपट आमदार निवास लवकरच चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज होणार आहे.

Web Title: Sunny Leone dance on popular marathi song 'Shantabai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.