देवसेना अनुष्का शेट्टीपेक्षा सनी लिओनीने मागितले जास्त मानधन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 07:06 AM2017-12-19T07:06:19+5:302017-12-19T13:34:13+5:30

सनी लिओनी ही भारतात सर्वात जास्त सर्च केली जाणाऱ्यां अभिनेत्रींपैकी एक आहे. सनीच्या प्रसिद्धीचा फायदा अनेक निर्मात्यांना आपल्या चित्रपटासाठी ...

Sunny Leone demanded more than Devsena Anushka Shetty! | देवसेना अनुष्का शेट्टीपेक्षा सनी लिओनीने मागितले जास्त मानधन!

देवसेना अनुष्का शेट्टीपेक्षा सनी लिओनीने मागितले जास्त मानधन!

googlenewsNext
ी लिओनी ही भारतात सर्वात जास्त सर्च केली जाणाऱ्यां अभिनेत्रींपैकी एक आहे. सनीच्या प्रसिद्धीचा फायदा अनेक निर्मात्यांना आपल्या चित्रपटासाठी करुन घ्यायचा आहे. मात्र सनीने आपल्या मानधनात वाढ केली आहे. सनीला साऊथमधल्या एका चित्रपटाची ऑफर आली आहे. यासाठी सनीने देवसेना अर्थात अनुष्का शेट्टीपेक्षा जास्त मानधन मागितले असल्याची माहिती आहे.   

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार सनीने या चित्रपटासाठी 3.5 कोटीची मागणी केली होती. ही रक्कम अनुष्का घेतल असलेल्या मानधनापेक्षा जास्त आहे. अनुष्काला बाहुबलीच्या दोन चित्रपटामध्ये अभिनय करण्यासाठी प्रत्येकी 2.5 कोटी देण्यात आले होते. सुरुवातीला सनीने मागितलेली रक्कम खूप जास्त वाटली मात्र त्यानंतर ते यासाठी तयार झाले. हा चित्रपट एकूण चार भाषेमध्ये तयार करण्यात येणार आहे. तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदीमध्ये तयार करण्यात येणार आहे. 

निर्मात्यांना विश्वास आहे की सनीला देण्यात आलेली रक्कम चित्रपटाच्या माध्यमातून वसूल होईल. कारण साऊथमध्ये सनीच्या फॅन्सची संख्या खूप जास्त आहे. चित्रपटाची कथा योद्धा असलेल्या राजकुमारीच्या आयुष्यावर आधारित आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे.  बेंगळुरुमध्ये 31डिसेंबरला सनी लिओनीचा कार्यक्रम होणार होता मात्र कन्नड संघटनांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

ALSO READ :  OMG! ​इमेज बदलण्याच्या प्रयत्नांत सनी लिओनी होणार ‘वाईल्ड’ !

कर्नाटक राज्याचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितले की, ‘मी अधिकाºयांना अशाप्रकारच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये, असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. त्यामुळे तिला (सनी लिओनी) या राज्यात आण नये. लोक कार्यक्रमाचा विरोध करीत आहेत. त्यांना (आयोजकांना) कन्नड संस्कृती आणि साहित्याशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे. दरम्यान, केआरवीचे पदाधिकारी हरीश यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘हा आमचा विजय आहे. सरकारने कार्यक्रम रद्द केला आहे.’

सनी एक बायोपिकमध्ये सुद्धा दिसणार असल्याची चर्चा आहे.  मीना कुमारीसारख्या अजरामर नायिकेची भूमिका सनी मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.  

Web Title: Sunny Leone demanded more than Devsena Anushka Shetty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.