VIDEO : अरे नहीं! हाय हील्स घालून सनी लिओनी पडली पूलमध्ये आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 16:10 IST2021-02-18T16:09:00+5:302021-02-18T16:10:01+5:30
Sunny Leone fall in swimming pool : काही वेळातच सनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIDEO : अरे नहीं! हाय हील्स घालून सनी लिओनी पडली पूलमध्ये आणि....
सनी लिओनी पूलमध्ये पडली, तिला कुणीतरी वाचवा! हा विनोद नाही, सत्य आहे. सनी लिओनीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी लिओनी पूलमध्ये पडताना दिसते आहे, परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही. वास्तविक, सनी पूलमध्ये पडतानाचा हा व्हिडिओ फनी आहे.
पूलमध्ये पडली सनी
सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असणारी सनी लिओनी ठणठणीत आहे. तिचा पूलमध्ये पडतानाचा हा व्हिडिओ स्टंट सीन नाही तर मजेदार व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सनीने यलो ड्रेस परिधान केला आहे. सनी लिओनीने यलो ड्रेससह रेड कलरच्या हील्सदेखील घातल्या आहे. गॉगल लावत सनी स्टाईलमध्ये पूलमध्ये पडताना दिसते आहे. काही वेळातच सनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, आतापर्यंत या व्हिडीओला 5,55,815 हुन अधिक लाईक्स आले आहेत. सनीचे फॅन यावर जोरादर कमेंट्स करतायेत.
सनी लियोनी विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘अनामिका’ सिनेमात काम करते आहे. सनीने 'जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले.