सनी लिओनीचे चाहते तिच्या नव-यावर फिदा, जाणून घ्या त्याच्या 'या' खास गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 18:37 IST2019-12-02T18:35:52+5:302019-12-02T18:37:17+5:30
सनी आपल्या यशाचे श्रेय नवऱ्याला म्हणजेच डॅनिअल वेबरलाच देते. परंतु, डॅनिअल याच्याविषयी फार थोडी माहिती लोकांना आहे.

सनी लिओनीचे चाहते तिच्या नव-यावर फिदा, जाणून घ्या त्याच्या 'या' खास गोष्टी
आता पर्यंत सगळ्यात जास्त चर्चा झाली ती फक्त आणि फक्त सनी लिओनीची. काही दिवसांपूर्वीच तिने शेअर केलेल्या बिकीनी लूकला एका दिवसांत 12 लाख लोकांनी पाहिले होते. तिच्या प्रत्येक फोटोला रसिकांची पसंती मिळते.
मात्र या सगळ्यांमध्ये सगळ्यांत जास्त क्रेझ वाढतेय ती सनी लिओनीचा पती डॅनिअल वेबरची. सनीच्या करिअरविषयी बोलताना तिच्या नवऱ्याचा हमखास उल्लेख होतो.
ती आपल्या यशाचे श्रेय नवऱ्याला म्हणजेच डॅनिअल वेबरलाच देते. परंतु, डॅनिअल याच्याविषयी फार थोडी माहिती लोकांना आहे. विशेष म्हणजे डॅनिअल हा गर्भश्रीमंत कुटुंबातील असून त्याचे वडील प्रसिद्ध बिझनेसमन होते. त्याची आई मल्टिनॅशनल कंपनीत वरिष्ठ पदावर जॉब करीत होती. डॅनिअल एक चांगला गिटारिस्ट असून त्याचा स्वतःचा रॉक बँडही आहे.
सनी पॉर्न स्टार असतानाही डॅनिअलचा तिच्या करिअरवर काही आक्षेप नव्हता. उलट तो तिचा बिझनेस मॅनेजर आहे. विशेष म्हणजे सनीपर्यंत पोहोचायचे असेल तर आधी डॅनिअलला भेटावे लागते. तिच्या व्यवसायाचे संपूर्ण काम तो बघतो. सनीप्रमाणेच डॅनिअल यानेही काही पॉर्न फिल्ममध्ये काम केले आहे.
तुर्तास तरूणींमध्ये डॅनिअलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. सनीसह डॅनिअल सा-यांचे लक्ष वेधून घेतो. त्याची डॅशिंग स्टाईल स्टेटमेंट तरूणींना भावते आहे. डॅनिअलही लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग असतो.