३७०० कोटी रुपयांच्या आॅनलाइन फसवणूक प्रकरणात सनी लिओनी यूपी पोलिसांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2017 08:26 AM2017-02-08T08:26:42+5:302017-02-08T14:01:23+5:30

सोशल ट्रेडिंगच्या नावाखाली घरबसल्या एका क्लिकवर लाखो रुपये कमाईचे आमिष दाखवून तब्बल सात लोकांना ३७०० कोटी रुपयांना गंडविल्याच्या प्रकरणात ...

Sunny Leone on the radar of the UP Police in an online fraud case of Rs 3700 crore | ३७०० कोटी रुपयांच्या आॅनलाइन फसवणूक प्रकरणात सनी लिओनी यूपी पोलिसांच्या रडारवर

३७०० कोटी रुपयांच्या आॅनलाइन फसवणूक प्रकरणात सनी लिओनी यूपी पोलिसांच्या रडारवर

googlenewsNext
शल ट्रेडिंगच्या नावाखाली घरबसल्या एका क्लिकवर लाखो रुपये कमाईचे आमिष दाखवून तब्बल सात लोकांना ३७०० कोटी रुपयांना गंडविल्याच्या प्रकरणात सनी लिओनी हिचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ईडीने अनुभव मित्तल यांची यापूर्वीच चौकशी सुरू केली असून, आता उत्तर प्रदेश पोलीस अभिनेत्री सनी लिओनी हिचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. 

मित्तलने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ग्रेटर नोएडा येथील एका हॉटेलमध्ये शानदार पार्टी दिली होती. या पार्टीत एका वेबसाइटचे सनी लिओनी हिच्या हस्ते लॉँचिंग करण्यात आले होते. टाइम्स आॅफ इंडियाच्या वृत्तानुसार चौकशी अधिकाºयांनी लॉँचिंगप्रसंगी उपस्थित असलेल्या कर्मचाºयांचीही झाडाझडती घेतली आहे. याविषयी एसटीएफचे डीएसपी राज कुमार मिश्रा यांनी सांगितले की, प्राइज चिट आणि मनी सर्कुलेशन स्कीम अ‍ॅक्ट १९७८ नुसार अशा प्रकारच्या फसव्या योजनांचा प्रचार करणे बेकायदेशीर आहे. आम्हाला याविषयीचे काही पुरावे आणि फोटोग्राफस् मिळाले असून, त्यामध्ये सनी लिओनी या योजनाचा प्रचार करीत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आवश्यकता भासल्यास सनीची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. 



वेबसाइट लॉँचिंगप्रसंगी अनुभव मित्तल यांच्याबरोबर सनी लिओनीचा व्हायरल झालेला फोटो
काय​ आहे प्रकरण
नोएडाच्या ‘एब्लेज इन्फो सॉल्युशन’ नावाच्या कंपनीच्या socialtrade.biz या वेबसाइटच्या माध्यमातून एका क्लिकवर आणि प्रत्येक लाइकवर ५ रुपये कमवायचे लोकांना आमिष दाखविण्यात आले होते. काही दिवस या स्कीमअंतर्गत लोकांना पैसेही दिले गेले. मात्र नंतर लोकांना पैसे देणे बंद झाले. तोपर्यंत कंपनीमध्ये सात लाख लोकांनी गुंतवणूक केलेली होती. आतापर्यंत १२ बॅँक खात्यांमधून ५१० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली असून, अनुभव मित्तल यांच्या १२ कोटी रुपयांच्या संपत्तीचा पोलिसांना शोध लागला आहे. त्याचबरोबर कंपनीमध्ये काम करणाºया सर्व कर्मचारी तथा अधिकाºयांचीही माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर लोकांनी reportfraud@upstf.com या वेबसाइटवर तक्रारी कराव्यात, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 

याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला असून, कंपनीच्या अनेक कार्यालयांवर छापे टाकण्याचे काम सुरू आहे. ज्यामध्ये काही आपत्तीजनक दस्तावेज मिळाल्याचाही ईडीने दावा केला आहे. त्याचबरोबर प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी सर्व प्रकारची चौकशी केली जाणार असून, चौकशीच्या घेºयात सनी लिओनी हिलादेखील ओढले जाण्याची शक्यता आहे. आता सनी या संपूर्णप्रकरणी काय खुलासा करणे हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Sunny Leone on the radar of the UP Police in an online fraud case of Rs 3700 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.