Sunny Leone : "सनी लिओनीने रिप्लाय केला तरच मी सिगरेट सोडेन", चाहत्याची अजब अट; अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:36 IST2022-12-23T15:22:57+5:302022-12-23T15:36:29+5:30
Sunny Leone : सनी लिओनीने दिलेला हा रिप्लाय आता जोरदार व्हायरल झाला.

Sunny Leone : "सनी लिओनीने रिप्लाय केला तरच मी सिगरेट सोडेन", चाहत्याची अजब अट; अभिनेत्री म्हणाली...
सोशल मीडियावर स्टार्स खूप सक्रिय असून ते आपल्या फॅन्सच्या सतत संपर्कात असतात. त्यामुळेच अनेकदा सेलिब्रिटी आस्क मी एनीथिंग सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. अशीच काहीशी घटना ही आता सनी लिओनी आणि तिच्या चाहत्यासोबत घडली आहे. स्वत:ला सनीचा फॅन आहे असं सांगणाऱ्या ए. एम. खान नावाच्या तरुणाने सिगरेट ओढण्याची सवय मोडण्यासाठी एक अजब अट ठेवली.
पाकिस्तानचा रहिवासी असलेल्या ए. एम. खानने त्याच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली. जर सनी लिओनीने मला रिप्लाय केला तर मी सिगरेट सोडेन, असं त्याने पोस्टमध्ये नमूद केलं होतं. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. विशेष म्हणजे खानच्या पोस्टवर स्वत: सनी लिओनीने देखील रिप्लाय केला. '...मग तू सिगरेट केव्हा सोडतो आहेस?' असा प्रश्न सनीने विचारला.
सनीने दिलेला हा रिप्लाय आता जोरदार व्हायरल झाला. 12 हजारांहून अधिक जणांनी सनीचा रिप्लाय लाईक केला आहे. पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर तरुणाने पोस्ट एडिट केली आणि नवं कॅप्शन लिहिलं. यानंतर आता सोशल मीडियावर आपापल्या आवडत्या सेलिब्रिटीला टॅग करून स्मोकिंग सोडण्याबद्दल बोलू लागले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"