सनी लिओनीचा खुलासा, ‘मला तर रोजच जिवे मारण्याच्या धमक्या मिळतात’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 10:29 AM2017-11-18T10:29:03+5:302017-11-18T15:59:03+5:30

‘पद्मावती’ या चित्रपटावरून राजपूत करणी सेनेने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे शीर धडापासून वेगळे करण्याची, तर अभिनेत्री दीपिका पादुकोणचे ...

Sunny Leone reveals, 'I get threats of killing every day'! | सनी लिओनीचा खुलासा, ‘मला तर रोजच जिवे मारण्याच्या धमक्या मिळतात’!

सनी लिओनीचा खुलासा, ‘मला तर रोजच जिवे मारण्याच्या धमक्या मिळतात’!

googlenewsNext
द्मावती’ या चित्रपटावरून राजपूत करणी सेनेने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे शीर धडापासून वेगळे करण्याची, तर अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाक कापणार असल्याची धमकी दिली. याच मद्द्यावर जेव्हा अभिनेत्री सनी लिओनी हिला विचारण्यात आले तेव्हा तिने मला अशा प्रकारच्या जिवे मारण्याच्या धमक्या रोजच मिळत असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले. यावेळी तिने ‘पद्मावती’चे समर्थनही केले. सनीने म्हटले की, ‘जर मी तुम्हाला माझ्या मोबाइलच्या इनबॉक्समध्ये गेल्या दोन दिवसांचे मॅसेज दाखविले तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.’ 

पुढे बोलताना सनीने म्हटले की, ‘मला रोजच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. दररोज कोणी ना कोणी विचित्रपणे मला धमकावितो. गेल्या सहा वर्षांपासून लोक माझ्याबद्दल विचित्र गोष्टी करीत आहेत. मात्र याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. खरं तर अशा धमक्यांमुळे मी माझ्या आयुष्यावर परिणाम करू इच्छित नाही. मी आनंदी असून, बॉलिवूडमध्ये काम करीत आहे.’  यावेळी सनीने अशाप्रकारच्या धमक्यांपासून वाचण्याची एक शक्कलही सांगितली. तिने म्हटले की, ‘पहिली गोष्टी तर आम्ही कलाकारांनी अशा धमक्यांना भिक घालायलाच नको. या धमक्यांवर जर आम्ही रिअ‍ॅक्ट झालो तर उगाचच त्यांना महत्त्व प्राप्त होते. मग अशात या गुडांना आपण का महत्त्व द्यावे? जर प्रकरण हाताबाहेर गेले तर पोलिसांकडे रितसर तक्रार करण्याचा पर्याय आहेच की. मीदेखील बºयाचदा पोलिसांकडे जाण्याचा पर्याय निवडला आहे. मी एका किटकाचे (एक यूजरकरिता वापरलेला शब्द) अशाच पद्धतीने ट्विटर अकाउंट बंद केले. 

सनीने सांगितले की, जेव्हा एक व्यक्ती (राजकारणी किंवा एखाद्या धार्मिक संघटनेचा नेता) तुम्हाला धमकी देतो अन् नंतर त्याचे कार्यकर्ते तुमच्याशी गुंडगिरी करतात तेव्हा ही बाब सर्वांत भीतीदायक असते. मला असे वाटते की, तुमच्या विचारात प्रगल्भता असायला हवी. जेव्हा मी पहिल्यांदा भारतात आली होती, तेव्हा मला असे वाटले की, लोक माझ्या प्रोफेशनल बॅकग्राउंडमुळे मला परत पाठवतील. मात्र असे घडले नाही. त्यांनी माझा स्वीकार केला. ‘पद्मावती’विषयी सांगायचे झाल्यास, सेन्सॉर बोर्ड याबाबतचा निर्णय घेण्यास सक्षम आहे. इतरांना उगाचच विरोध करण्यात काही अर्थ नाही. 

Web Title: Sunny Leone reveals, 'I get threats of killing every day'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.