'त्यांना पॉर्न इंडस्ट्रीबद्दल सांगितलं होतं'; सनीच्या निर्णयावर कुटुंबीयांनी दिलेली 'ही' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 02:02 PM2021-09-07T14:02:48+5:302021-09-07T14:03:16+5:30

Sunny leone :पॉर्नस्टार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या सनीने पॉर्न इंडस्ट्रीला रामराम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

sunny leone reveals what her parents thought of her profession how they protected her | 'त्यांना पॉर्न इंडस्ट्रीबद्दल सांगितलं होतं'; सनीच्या निर्णयावर कुटुंबीयांनी दिलेली 'ही' प्रतिक्रिया

'त्यांना पॉर्न इंडस्ट्रीबद्दल सांगितलं होतं'; सनीच्या निर्णयावर कुटुंबीयांनी दिलेली 'ही' प्रतिक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देकुटुंबाच्या विरोधात जाऊन सनीने केलं होतं पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पदार्पण

'बेबी डॉल' या आयटम साँगमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. पॉर्नस्टार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या सनीने पॉर्न इंडस्ट्रीला रामराम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, आजही अनेकदा सोशल मीडियावर तिच्या भूतकाळातील घटना चर्चेत येतात. यातच सनीने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे  करिअरची सुरुवात केली ही चर्चा रंगली आहे. सनीने स्वत: पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिचा हा निर्णय कुटुंबीयांना मान्य नव्हता. त्यामुळेच तिच्या आई-वडिलांनी या प्रकरणी नाराजीही व्यक्त केली होती, असं तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

सध्या सोशल मीडियावर सनीची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये आलेले वाईट अनुभव आणि पालकांची ओढावलेली नाराजी यावर भाष्य केलं आहे. व्यावसायिकदृष्ट्या पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा सनीने घेतलेला निर्णय तिच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. मात्र, अखेर लेकीच्या हट्टामुळे कुटुंबीयांनी माघार घेतली, असं ती म्हणते.

"मी माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. हा फक्त माझ्यासाठी एक व्यवसाय होता. त्याकाळी मी पेंटहाऊस (अडल्ट इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध मासिक) कव्हर ऑफ द इअर ठरले होते. त्यामुळे मला $100,000 म्हणजे जवळपास ६८ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आलं होतं. त्यानंतर मी माझ्या कुटुंबीयांना पॉर्न इंडस्ट्रीमधील कामाविषयी सांगितलं. सहाजिकच इतर पालकांप्रमाणे तेदेखील माझ्यावर रागावले. पण, ज्यावेळी मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं त्यावेळी त्यांनी नमतं घेत माघार घेतली", असं सनी म्हणाली.

शीख कुटुंबात झाला सनीचा जन्म

१९८१ मध्ये कॅनडामधील सारनिया ओंटारियो येथे एका शीख कुटुंबात सनीचा जन्म झाला. सनी ११ वर्षांची असताना तिचे कुटुंब अमेरिकेत शिफ्ट झाले. सनीचे वडील इंजिनिअर असून, तर आई गृहिणी आहे. सनी सध्या मुंबईत स्थायिक असून तिला तीन मुलंदेखील आहेत. विशेष म्हणजे सनीने पॉर्न इंडस्ट्री सोडून आता बॉलिवूडमध्ये स्थिरावली आहे.
 

Web Title: sunny leone reveals what her parents thought of her profession how they protected her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.