सनी लिओनीने घेतला ‘या’ गंभीर आजाराचा धसका, व्हिडीओ एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 12:47 PM2020-01-30T12:47:46+5:302020-01-30T12:48:20+5:30
सनीला भरली धडकी... चाहती जवळ येताच केले असे काही...
बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी सध्या एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या शूटींगसाठी नुकतीच सनी भारताबाहेर रवाना झाली. यावेळी पती डेनियल आणि तिची टीमही तिच्यासोबत दिसले. सनी दिसताच नेहमीप्रमाणे चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली. ऐरवी सनी सेल्फीसाठी चाहत्यांना कधीही नकार देत नाही. पण यावेळी मात्र सनीने सेल्फी देण्यास चक्क नकार दिला. होय, एका गंभीर आजाराला घाबरून सनीने असे केले. हा आजार कुठला तर कोरोना व्हायरस.
होय, कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आत्तापर्यंत चीनमध्ये 132 लोकांना मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. अत्यंत घातक कोरोना विषाणूच्या संसगार्चा सर्वाधिक धोका असलेल्या ३० देशांत भारताचाही समावेश आहे. अशात सगळ्यांनाच धडकी भरली आहे. सनी सुद्धा त्याला अपवाद नाही. कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सनीने चाहत्यांना सेल्फी न देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी एअरपोर्टवर जे काही दृश्य दिसले त्यावरून तरी हेच म्हणावे लागेल.
Safe is the new COOL with @DanielWeber99 !!
— Sunny Leone (@SunnyLeone) January 29, 2020
Don’t be ignorant about what is happening around you or think the Coronavirus can’t affect you!
Be smart and be safe! #BeSafe#India#coronaviruspic.twitter.com/Gwl8fBCnwz
एअरपोर्टवर अनेकांनी सनीला सेल्फीसाठी विनंती केली. पण तिच्या टीमने सेल्फीसाठी नकार दिला. पण याचदरम्यान एक मुलगी आपला फोन घेऊन सनीजवळ आली. ती जवळ येताच सनीने तोंडावर मास्क चढवला. चाहतीने सनीला मास्क हटवण्याची विनंती केली. पण कुठलीही रिस्क घेण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या सनीने या चाहतीकडे साफ दुर्लक्ष करत, पुढची वाट धरली.
सनीने पती डेनियलसोबत एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत तिच्या व डेनियल दोघांच्याही चेह-यावर काळा मास्क आहे. सुरक्षित राहणे हेच आपल्या हातात आहे, असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.