सनी लिओनीची कंडोमची जाहिरात पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; आता गोव्यातून झाला विरोध!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 01:14 PM2017-08-02T13:14:40+5:302017-08-02T19:12:55+5:30

अभिनेत्री सनी लिओनी हिची कंडोमची जाहिरात पुन्हा एकदा वादाच्या भोवºयात सापडली आहे. गोव्यातील एका राजकीय नेत्याने यास विरोध केल्याने ...

Sunny Leone's promotion of condom again in controversy; Now the opposition from Goa! | सनी लिओनीची कंडोमची जाहिरात पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; आता गोव्यातून झाला विरोध!

सनी लिओनीची कंडोमची जाहिरात पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; आता गोव्यातून झाला विरोध!

googlenewsNext
िनेत्री सनी लिओनी हिची कंडोमची जाहिरात पुन्हा एकदा वादाच्या भोवºयात सापडली आहे. गोव्यातील एका राजकीय नेत्याने यास विरोध केल्याने सनीची ही जाहिरात वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या नेत्याने म्हटले की, ज्या पद्धतीने या जाहिरातीचा प्रचार केला जात आहे, तो त्वरित बंद व्हायला हवा. ही जाहिरात मनात लज्जा निर्माण करणारी असून, या जाहिरातीवरच बंदी आणायला हवी. सनी मॅनफोर्स कंडोमची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. ती या जाहिरातीत बघावयास मिळत असून, या अगोदरदेखील या जाहिरातीला विरोध करण्यात आला होता. 



दरम्यान, फ्रान्सिस्को सिल्वेरिया यांनी विरोध करताना या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. फ्रान्सिस्को यांच्या मते, गोव्यातील ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसेसवर सनीच्या या जाहिरातीचा बेभानपणे प्रचार केला जात आहे. या जाहिरातीचे अश्लील पोस्टर्स बसेसवर लावण्यात आले आहेत. अशाप्रकारच्या जाहिराती बघून गोवावासीयांनी काय शिकायला हवे? बसमध्ये विद्यार्थी प्रवास करतात, त्यांच्यावर अशा जाहिरातीचा काय परिणाम होईल? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्याचबरोबर अशा प्रकारच्या जाहिरातीचा लोकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने या जाहिराती त्वरित बंद करायला हव्यात. 



ही जाहिरात सनी लिओनी हिच्यावर शूट करण्यात आली आहे. कादंबा ट्रान्सपोर्टच्या बसेसवर सध्या या जाहिरातीचा प्रचार केला जात आहे. गर्भनिरोधक कंपनी आणि निगम यांच्यात झालेल्या कराराअंतर्गतच या जाहिरातीचा प्रचार केला जात आहे. दरम्यान, या अगोदर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या महिला शाखेकडून सनीच्या या जाहिरातीला जोरदार विरोध केला होता. त्यावेळी पार्टीच्या वतीने म्हणण्यात आले होते की, ही जाहिरात बघून महिलांना लज्जास्पद वाटते, कारण या जाहिरातीमधून विचित्र संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावेळी पार्टीने ही जाहिरात बंद केली जावी, अशी मागणी केली होती. 



यावेळी सनीनेही तिचे मत मांडले होते. सनीने म्हटले होते की, ‘जेव्हा मी ब्रॅण्ड साइन करीत असते, तेव्हा त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत असते. हे अगदी तसेच आहे, जसे एखाद्या मुलाला जन्म देऊन या जगात आणले जाते. कारण कुठलेही दाम्पत्य परिवाराचे प्लॅनिंग तेव्हाच करते जेव्हा त्यांच्यात जाणीव होते की, ते मुलाची जबाबदारी स्वीकारण्यास सक्षम आहेत. सनीचे हे वक्तव्य त्यावेळी चांगलेच वादग्रस्त ठरले होते. 

Web Title: Sunny Leone's promotion of condom again in controversy; Now the opposition from Goa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.