सुपर डान्सरच्या सेटवर वरुण धवनने सांगतले त्याचे अॅब्स बनवण्यामागचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 05:55 PM2019-03-28T17:55:15+5:302019-03-28T18:00:51+5:30
सिलिगुडीच्या दहा वर्षीय अवस्था थापाने वरुण धवनला विचारले की, लहानपणी तो खोडकर होता का आणि त्याच्या खोड्यांबद्दल त्याने आपल्या आईवडिलांचा कधी मार खाल्ला आहे का? तेव्हा वरुणने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते.
कलंक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या या चित्रपटाची टीम करत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले आलिया भट्ट, वरुण धवन आणि सोनाक्षी सिन्हा यांनी नुकतीच सुपर डान्सर ३ या कार्यक्रमाच्या सेटला भेट दिली. या कार्यक्रमाच्या शादी स्पेशल भागात ते उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमातील सगळ्याच चिमुकल्यांचा परफॉर्मन्स या सगळ्यांना आवडला. त्यांनी या चिमुरड्यांचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या खोड्या पाहून या कलाकारांना आपले बालपण आठवले होते. लहानपणी सर्वचजण काही ना काही खोड्या करतात आणि कलंकच्या कलाकारांनी देखील आपल्या लहानपणीच्या या गंमतीदार आठवणींना यावेळी उजाळा दिला.
सिलिगुडीच्या दहा वर्षीय अवस्था थापाने वरुण धवनला विचारले की, लहानपणी तो खोडकर होता का आणि त्याच्या खोड्यांबद्दल त्याने आपल्या आईवडिलांचा कधी मार खाल्ला आहे का? तेव्हा वरुणने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते. आई-वडिलांचा मार खाण्यापासून वाचण्यासाठीच मी अॅब्ज बनवले असे गंमतीशीर उत्तर वरुणने दिले. तो म्हणाला, “मी खूप खट्याळ असल्याने माझ्या आईच्या हातचा मार खायचो. मी आणि माझा भाऊ यांमध्ये मला जास्त मार पडायचा आणि बोलणी देखील मलाच खावी लागायची. मी आई, बाबांप्रमाणेच रोहितचा (वरुणचा भाऊ) देखील मार खाल्ला आहे. मी याच कारणाने अॅब्स बनवायला सुरुवात केली, कारण जेव्हा ते मला मारायचे तेव्हा मला दुखायचे आणि मला वाटले की, जर माझे अॅब्स असतील तर मला दुखणार नाही. मला वाटते की, एका विशिष्ट वयानंतर जेव्हा आई तुम्हाला मारते तेव्हा तुम्हाला दुखत नाही. उलट तुम्ही तिला दुखावलेत याचा तुम्हाला जास्त त्रास होतो.”
सोनाक्षी सिन्हाच्या दबंग या चित्रपटातील प्रसिद्ध संवादात किंचितसा बदल करून तो म्हणाला, “थप्पड से डर नहीं लगता माँ, आपकी इन्सल्ट से लगता है.”
सुपर डान्सरचा हा भाग प्रेक्षकांना शनिवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता सोनीवर पाहायला मिळणार आहे.