​साऊथच्या ‘या’ सुपरस्टारचा ‘सरैनोडु’ युट्यूबवर सुपर-डुपरहिट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 10:21 AM2018-03-20T10:21:49+5:302018-03-20T15:51:49+5:30

अभिनेता अलु अर्जुन तेलगु सिनेमाचा सुपरस्टार आहे. बॉक्सआॅफिसपासून टेलिव्हिजन, यु-ट्यूब प्रत्येक ठिकाणी त्याचे चित्रपट सुपरहिट आहेत. अलु अर्जुनच्या एका चित्रपटाने तर यु-ट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. होय

Super-DupperHeat on YouTube's 'Super' Starring 'Saranodu' !! | ​साऊथच्या ‘या’ सुपरस्टारचा ‘सरैनोडु’ युट्यूबवर सुपर-डुपरहिट!!

​साऊथच्या ‘या’ सुपरस्टारचा ‘सरैनोडु’ युट्यूबवर सुपर-डुपरहिट!!

googlenewsNext
िनेता अलु अर्जुन तेलगु सिनेमाचा सुपरस्टार आहे. बॉक्सआॅफिसपासून टेलिव्हिजन, यु-ट्यूब प्रत्येक ठिकाणी त्याचे चित्रपट सुपरहिट आहेत.  अलु अर्जुनच्या एका चित्रपटाने तर यु-ट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. होय, अलु अर्जुनचा ‘सरैनोडु’ हा हिंदीतील डब सिनेमा यु-ट्यूबवरचा सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय चित्रपट ठरला आहे. आत्तापर्यंत १४ कोटी ५७ लाख लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटास ५० लाखांवर लाइक्स मिळाले आहे. अद्याप कुठल्याही भारतीय चित्रपटाला हा पल्ला गाठता आलेला नाही. फिल्म ट्रेड एक्सपर्ट रमेश बाला यांनी ही माहिती दिलीयं.



‘सरैनोडु’ हा मूळचा तेलगू सिनेमा २०१६ मध्ये रिलीज झाला होता. यानंतर २८ मे २०१७ रोजी या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन रिलीज करण्यात आले होते. तेव्हापासून हा चित्रपट पाहणा-यांची संख्या दिवसागणिक वाढतेय.
‘सरैनोडु’चा अर्थ होतो योग्य व्यक्ती. अलु अर्जुनचा हा चित्रपट २२ एप्रिल २०१६ रोजी रिलीज झाला होता. बोयापती श्रीनु यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अलुशिवाय रकुल प्रीत सिंह, कॅथरिन टेरसा आणि श्रीकांत मुख्य भूमिकेत होते. ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १२७ कोटींचा बिझनेस केला होता. सत्याची कास धरलेल्या व्यक्तीची भूमिका अलुने यात साकारली होती. अलु अर्जुनचे वडिल अलु अरविंद यांनीचं हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. अलुचे आजोबा अलु रामा लिंगय्या हे विनोदी कलाकार होते.   त्यामुळे अलु अर्जुनला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला. अलु अर्जुन याचा ‘डीजे’ हा चित्रपटही यु ट्यूबवर सुपरहिट आहे. याला कोट्यवधी व्ह्युज मिळाले आहेत. तसेही साऊथच्या चित्रपटातील जबरदस्त अ‍ॅक्शन लोकांना प्रचंड आवडते. त्यामुळे या चित्रपटांचा एक खास चाहता वर्ग आहे. साऊथच्या चित्रपटांचे हिंदी व्हर्जनही अलीकडे वेगाने लोकप्रीय होत आहेत.

Web Title: Super-DupperHeat on YouTube's 'Super' Starring 'Saranodu' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.