सुपरहिट होताच बांधली लगीनगाठ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 03:30 PM2018-05-04T15:30:41+5:302018-05-04T21:04:59+5:30

येत्या ८ मे रोजी अभिनेत्री सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. सोनम सध्या तिच्या करिअरच्या सर्वोच्च ...

The superhit was built soon !! | सुपरहिट होताच बांधली लगीनगाठ!!

सुपरहिट होताच बांधली लगीनगाठ!!

googlenewsNext
येत्या ८ मे रोजी अभिनेत्री सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. सोनम सध्या तिच्या करिअरच्या सर्वोच्च स्थानी आहे. गेल्या वर्षीच तिला ‘नीरजा’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच लवकरच तिचा ‘वीरे दी वेडिंग’ हा बहुप्रतिक्षित चित्रपटही प्रदर्शित होत आहे. एकूण काय तर सोनमने बॉलिवूडमध्ये सुपरहिटचा झेंडा रोवल्यानंतरच लग्नाच्या बंधनात अडकणे योग्य समजले. वास्तविक असा निर्णय घेणारी सोनम पहिलीच अभिनेत्री नसून, या अभिनेत्रींनीही करिअरचा गाडा रुळावर आणल्यानंतरच साताजन्माच्या गाठी बांधल्या. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...




अनुष्का शर्मा

२००८ मध्ये ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात करणाºया अभिनेत्री अनुष्का शर्माने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले. ज्यामध्ये ‘बॅण्ड बाजा बारात, जब तक है जान, पीके’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर स्वत:च्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत तिने ‘एनएच१०, फिल्लोरी’ यासारख्या हिट चित्रपटांची निर्मिती केली. करिअरमध्ये एक उंची गाठल्यानंतर तिने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी विवाह केला. लग्नानंतर तिच्या होम प्रोडक्शनचा ‘परी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचबरोबर ती वरुण धवनसोबत ‘सुई-धागा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 



असिन​ खान
सुपरहिट ‘गजनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री असिन खान सध्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहे. असिनने इंडस्ट्रीत दोन बड्या खानसोबत काम केले आहे. ज्यामध्ये सलमान खानसोबत ‘रेडी’, तर आमीर खानसोबत ‘गजनी’ हा चित्रपट केला. तिचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरले. बॉलिवूडमध्ये करिअर स्थिर झाल्यानंतर तिने २०१६ मध्ये मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा यांच्याशी विवाह केला. 



काजोल

अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणची जोडी आजही प्रेक्षकांना भावते. लग्नाअगोदर या जोडीला प्रेक्षकांचे जेवढे प्रेम मिळायचे तेवढेच प्रेम लग्नानंतरही मिळत आहे. काजोलने आपल्या करिअरमध्ये एक ठरावीक उंची गाठल्यानंतर अजयसोबत लग्न केले. तिने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कभी खुशी कभी गम, कुछ-कुछ होता है, करण-अर्जुन आणि बाजीगर’ यासारख्या सुपर-डुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 



नम्रता शिरोडकर
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरची लहान बहीण नम्रता शिरोडकर हिने साऊथ सुपरस्टार महेश बाबू याच्यासोबत साताजन्माच्या गाठी बांधल्या. ‘वास्तव, ब्राइड अ‍ॅण्ड प्रेज्युडिस’ यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविल्यानंतर तिने लग्नाचा निर्णय घेतला. सध्या नम्रता चित्रपटांपासून दूर असून, आपल्या संसारात व्यस्त आहे. 



भाग्यश्री

ब्लॉकबस्टर ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून रातोरात स्टारडम मिळालेल्या अभिनेत्री भाग्यश्रीनेदेखील असाच निर्णय घेणे योग्य समजले. प्रसिद्धीझोतात आल्यानंतर लगेचच तिने आपल्या जोडीदाराची निवड केली. भाग्यश्रीने अभिनेता ते निर्माता बनलेल्या हिमालय डसानी यांच्याशी लग्नाची गाठ बांधली. 

Web Title: The superhit was built soon !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.