Govinda Net Worth : बॉलिवूडपासून दूर तरीही वर्षाला कोटींची कमाई; नेमकं करतो तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 02:18 PM2024-06-06T14:18:13+5:302024-06-06T14:31:41+5:30

चित्रपटांपासून दूर असूनही गोविंदा राजा बाबूचं आयुष्य जगतो.

Superstar Of Bollywood Govinda Net Worth and and earning source | Govinda Net Worth : बॉलिवूडपासून दूर तरीही वर्षाला कोटींची कमाई; नेमकं करतो तरी काय?

Govinda Net Worth : बॉलिवूडपासून दूर तरीही वर्षाला कोटींची कमाई; नेमकं करतो तरी काय?

अभिनय, नृत्य आणि विनोदाचा उत्तम टायमिंग यामुळे एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. ८० – ९०च्या दशकात गोविंदाचे अनेक चित्रपट हिट ठरले होते. आजही जगभरात गोविंदाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्याबद्दल जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात. बॉलिवूडमध्ये सक्रीय नसला तरीही गोविंदा मोठ्या प्रमाणावर पैसे छापतो. गोविंदाकडे एकूण संपत्ती किती आहे आणि तो ती कशी कमावतो, हे तुम्हाला ठाऊक आहे? तर याबद्दल जाणून घेऊया. 

चित्रपटांपासून दूर असूनही गोविंदा राजा बाबूचं आयुष्य जगतो. जनसत्ताच्या रिपोर्टनुसार, गोविंदाची एकूण संपत्ती 151 कोटींहून अधिक आहे. गोविंदाचे अनेक बंगले आहेत. प्रत्येक बंगल्याची किंमत कोटींमध्ये आहे. गोविंदा रिॲलिटी शोमध्ये दिसतो, पण त्याची मुख्य कमाई ब्रँड एंडोर्समेंट आणि रिअल इस्टेटमधून येते. गोविंदा दरवर्षी 16 कोटींहून अधिक कमावतो. यापैकी गोविंदा ब्रँड एंडोर्समेंटमधून अंदाजे 2 कोटी रुपये कमावतो. रिपोर्टनुसार त्यांच्याकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. ज्यामध्ये Mitsubishi Lancer, Ford Endeavor सारख्या गाड्यांचा समावेश आहे. त्यांची लग्झरी लाइफस्टाइल त्यांच्या कार कलेक्शनमधून देखील दिसून येते. 

गोविंदा राहत असलेल्या बंगल्याचे नाव जल दर्शन आहे. गोविंदा आपल्या मुलांसह पत्नीसह येथे राहतो. गोविंदाचा अमेरिकेतही बंगला आहे. यासोबतच गोविंदाचा मुंबईतील मड आयलंडमध्येदेखील एक बंगला आहे. हा बंगला गोविंदा चित्रपटांच्या शूटिंगसाठी भाड्याने देतो. यातून त्यांची मोठी कमाई होती. एवढंच नाही तर गोविंदाचा कोलकाता येथेही बंगला आहे, तिथून तो मोठी कमाईही करतो. शिवाय, गोविंदाचे दोन फार्महाऊस देखील आहेत. 

गोविंदा आता २०२४ मध्ये निवडणूक शिवसेनेकडून लढणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत काही दिवसांपुर्वीच त्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.  गोविंदाने २००४ साली त्यांनी कांग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. इतकंच नाही तर ही निवडणूक जिंकून तो खासदार देखील बनला होता. आता दब्बल दोन दशकांनंतर त्यानं पुन्हा राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. गोविंदाने 1980 मध्ये ॲक्शन आणि डान्सिंग हिरो म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.  कॉमेडी हिरो म्हणून घराघरात पोहचला अन् त्याला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. 
 

Web Title: Superstar Of Bollywood Govinda Net Worth and and earning source

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.