अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या अभिनेत्रीला सुपरस्टार पवन कल्याणने दिला ‘हा’ सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 01:11 PM2018-04-15T13:11:24+5:302018-04-15T18:41:24+5:30
जम्मूमध्ये आठवर्षीय चिमुरडीसोबत झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा विरोध करण्यासाठी सुपरस्टार तथा राजकारणी पवन कल्याण आज हैदराबादमधील रस्त्यावर ...
ज ्मूमध्ये आठवर्षीय चिमुरडीसोबत झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा विरोध करण्यासाठी सुपरस्टार तथा राजकारणी पवन कल्याण आज हैदराबादमधील रस्त्यावर उतरला होता. पवनने महिलांवर होत असलेल्या हिंसाचारासंदर्भात कायद्यात कठोर तरतूद करण्याची मागणी केली. तसेच हेदेखील म्हटले की, महिलांवर होत असलेले अशाप्रकारचे अत्याचार रोखण्यासाठी एखाद्यास कायदा हातात घेण्याची वेळ आली तरी त्याने ते करावे. माध्यमांशी बोलताना पवनने अभिनेत्री श्री रेड्डी हिच्याबद्दलही प्रतिक्रिया व्यक्त केली. श्री रेड्डीने काही दिवसांपूर्वी भररस्त्यात अर्धनग्न आंदोलन करून खळबळ उडवून दिली होती. त्याचबरोबर तेलगू इंडस्ट्रीतील काही प्रसिद्ध व्यक्तींची नावे घेत त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला.
पवनने श्रीबद्दल म्हटले की, जर तिला न्याय हवा असेल तर तिने पोलीस स्टेशन अथवा कोर्टात धाव घ्यायला हवी. अशाप्रकारे माध्यमांसमोर प्रदर्शन करू नये. कारण न्यायालयात बाजू न मांडता टीव्ही चॅनलवरच ती स्वत:ला झळकवत असेल तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. माध्यमे केवळ संदेश पोहचविण्याचे काम करीत असतात. त्यामुळे सरकारी विंग्सच्या माध्यमातूनच तिला न्याय दिला जाऊ शकतो. दरम्यान, श्री रेड्डीने आरोप केला होता की, तामीळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये बहुतांश महिलांना काम मिळविण्यासाठी सेक्शुअल हरॅशमेंट किंवा कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो. स्ट्रगलिंग फिमेल अॅक्ट्रेस यास सर्वाधिक बळी पडतात.
दरम्यान, श्री रेड्डी तेव्हा चर्चेत आली जेव्हा हैदराबाद येथे फिल्म कमिशन कार्यालयाच्या समोर तिने अर्धनग्न होत आंदोलन केले. आंदोलनानंतर तिने ‘बाहुबली-२’मध्ये भल्लालदेवची भूमिका साकारणाºया राणा दग्गुबातीचा भाऊ अभिराम दग्गुबाती याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. तसेच निर्माता सुरेश बाबुच्या मुलाने मला सेक्शुअली अॅब्यूज केल्याचेही तिने म्हटले होते. याबाबतचे तिने काही प्रायव्हेट मॅसेज आणि फोटोज्ही लीक केले होते. श्रीने लेखक कोना वेंकट आणि दिग्दर्शक शेखर कमुला यांच्यावरही आरोप केले आहेत.