Ramcharan : सुपरस्टार रामचरण अनवाणी एयरपोर्टवर दाखल झाला, दरवर्षीप्रमाणेच करतोय कठीण व्रत; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 01:55 PM2023-02-21T13:55:16+5:302023-02-21T13:57:29+5:30
साऊथ सुपरस्टार्स लोकप्रियतेच्या शिखरावर असले तरी त्यांचे राहणीमान तितकेच साधे असते.
साऊथ सुपरस्टार्स लोकप्रियतेच्या शिखरावर असले तरी त्यांचे राहणीमान तितकेच साधे असते. सध्या 'RRR'सिनेमाचा जगभरात डंका आहे. सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर २०२३ मध्ये नामांकन मिळाले आहे. साऊथ सुपरस्टार रामचरण (Ramcharan) नुकताच हैदराबाद एअरपोर्टवर दिसला. यावेळी तो चक्क अनवाणी होता. अनवाणी चालण्याचे त्याचे नेमके काय कारण असा प्रश्न पडला असेल ना?
रामचरणचा हैदराबाद विमानतळावरील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रामचरण कारमधून उतरताना दिसतो. त्याने पूर्ण काळे कपडे घातलेले आहेत. तर हातात एक खांद्यावर काळं आणि भगव्या रंगाचं काठ असलेलं उपरणं आहे. तर काळ्या रंगाचाच मास्क लावलेला दिसत आहे.
Representation of hindutva culture is not hurting sentiment of other culture rather then presenting ourselves in a such way that everyone is proud of our culture 👍🏼#RamCharan A True ambassador for Hindu culture representation to world of #Oscars#SSRajamouli#RRR#JRNTRpic.twitter.com/vjLycC4EqP
— 𝕵10™🇮🇳 (@Vijayamrutraj) February 21, 2023
काही दिवसांपूर्वी रामचरण आणि आनंद महिंद्रा यांची एका इव्हेंटमध्ये भेट झाली होती. तेव्हा सुद्धा रामचरण अनवाणी होता. तर यामागचं कारण आहे ते म्हणजे रामचरण १० फेब्रुवारीपासून भगवान अयप्पा स्वामी यांचे महाव्रत करत आहे. दरवर्षीच तो हे व्रत करतो. रामचरणनं 41 दिवसांची भगवान अयप्पांची दीक्षा घेतली आहे. या 41 दिवसांत दीक्षा घेणाºया भाविक आपलं सगळं काही भगवान अयप्पांना समर्पित करतो. सबरीमाला येथील भगवान अयप्पांचे दर्शन घेण्याची इच्छा असलेल्या भाविकाला त्याआधी 41 दिवसांचं व्रत पूर्ण करावं लागतं. याला मंडलम म्हणतात. या काळात अनेक गोष्टी वर्ज्य असतात. 41 दिवस काळी वस्त्र परिधान करणं, चटईवर झोपणं, अनवाणी फिरणं, ब्रह्मचर्य पाळणं, मासांहार-मद्यपानाचा त्याग, दिवसातून एकवेळ सात्विक भोजन, रोज संध्याकाळी पूजा अर्चा अशा कडक नियमांचं पालन करावं लागतं.
माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार अभिनेता रामचरण ऑस्कर्स सोहळ्यासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. मात्र भारतीय संस्कृतीला धरुन तो तशाच वेशभूषेत अतिशय कठिण व्रत करत असताना तो परदेशात जात आहे. क्वचितच एखाद्या कलाकाराने ही कृती केली असेल असं म्हणत चाहतेही राणचरणचे कौतुक करत आहेत.
First person in the world going to attend oscars in swamy mala carrying Indian culture to the world#RamCharan off to USA for the #Oscars95 awards ceremony.#ManOfMassesRamCharan@AlwaysRamCharan 🙏🏻🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/6SIEehYbSc
— Ravi Naidu (@RaviNai97590137) February 21, 2023
१३ मार्च रोजी ऑस्कर सोहळा रंगणार आहे. त्यापूर्वी रामचरणने हे कठिण व्रत केले आहे. 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' हे गाणं इतिहास रचेल अशी आशा आहे.