‘पद्मावती’वर बेजबाबदार वक्तव्ये करणा-यांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक! विदेशातील बंदीची याचिका खारिज!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 07:49 AM2017-11-28T07:49:01+5:302017-11-28T13:19:01+5:30

‘पद्मावती’ चित्रपटावरून देशभर रान माजले असताना सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या मेकर्सला काहीसा दिलासा दिला आहे.  ‘पद्मावती’च्या भारताबाहेरील प्रदर्शनावर बंदी ...

Supreme court verdict on irresponsible statements on 'Padmavati'! External ban ban petition! | ‘पद्मावती’वर बेजबाबदार वक्तव्ये करणा-यांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक! विदेशातील बंदीची याचिका खारिज!

‘पद्मावती’वर बेजबाबदार वक्तव्ये करणा-यांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक! विदेशातील बंदीची याचिका खारिज!

googlenewsNext
द्मावती’ चित्रपटावरून देशभर रान माजले असताना सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या मेकर्सला काहीसा दिलासा दिला आहे.  ‘पद्मावती’च्या भारताबाहेरील प्रदर्शनावर बंदी घाला, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी फेटाळून लावली. केवळ इतकेच नाही तर ‘पद्मावती’संदर्भात  बेजबाबदार वक्तव्ये करणारे विविध राज्यांचे मुख्यमंत्री व नेत्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने फैलावर घेतले. नागरिक अशा मुद्यांवर चर्चा करत असतील तर तो एक वेगळा विषय आहे. पण सार्वजनिक पदांवर बसलेल्या व्यक्ती अशी वक्तव्ये करू शकत नाहीत.  सेन्सॉर बोर्डाने अद्याप ‘पद्मावती’ला प्रमाणपत्र जारी केलेले नाही. अशास्थितीत जबाबदार पदावर बसलेल्या लोकांनी या चित्रपटाबद्दल वा यातील कलाकारांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणे गैर असल्याचे न्यायालयाने म्हटले. असे केल्याने सेन्सॉर बोर्डाचा निर्णय प्रभावित होण्याचा धोकाही सर्वोच्च न्यायालयाने बोलून दाखवला.

सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने विदेशात या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करणारी याचिका खारिज केली. पेशाने वकील असलेले एम. एल. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती.  ‘पद्मावती’त ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करण्यात आल्याचा दावा करत, अनेकांनी या चित्रपटाला विरोध चालवला आहे. अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या चित्रपटाविरोधात बयानबाजी केलीय. काही नेत्यांनी ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचे शिर व नाक कापण्याची धमकी दिली आहे.  
‘पद्मावती’ चि़त्रपटावर बंदी घातली पाहिजे. चित्रपट सृष्टीला कुठली अस्मिता किंवा राष्ट्रवादाशी काही देणे घेणे नाही. त्यांना फक्त पैसा हवा आहे. यासाठी ते नग्न नाचण्यासही तयार होतील, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

ALSO READ ; padmavati controversy: ​ ‘भन्साळींचे शिर कापा’ ते ‘दीपिकाचे नाक कापू’पर्यंत ‘पद्मावती’बद्दलची ८ वादग्रस्त वक्तवे...!

थोड्याफार पैशांसाठी इतिहासाची मोडतोड करुन चित्रपटाची निर्मिती करणे अतिशय लज्जास्पद आहे.  भन्साळीसारख्या लोकांना दुसरी कोणतीही भाषा समजत नाही. त्यांना फक्त चपलांची भाषा समजते,असे मध्य प्रदेशच्या उज्जैनचे खासदार असलेल्या चिंतामणी मालवीय यांनी म्हटले आहे.

Web Title: Supreme court verdict on irresponsible statements on 'Padmavati'! External ban ban petition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.